Makar Sankranti 2020 Black Dress Fashion Tips (Photo Credits: Instagram)

नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti 2020)उद्या 15 जानेवारी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या सणाची खासियत म्हणजे तिळगूळ (Tilgul), पतंग, हलव्याचे दागिने,आणि काळे कपडे. वास्तविक सणाला किंवा शुभ मुहूर्तावर काळे कपडे (Black Clothes) न घालण्याचा आपल्या संस्कृतीमध्ये अलिखित नियम आहे. पण मकर संक्रातीचा सण मात्र याला अपवाद आहे. मकरसंक्राती दिवशी हमखास काळे कपडे घातले जातात. यामागील मुख्य कारण म्हणजे जानेवारी महिन्यात थंडी  असते. अशा वेळेस काळ्या रंगाचे सुती कपडे घातल्याने उष्णता शोषून अधिक काळ शरीरात उब टिकून राहते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मकर संक्राती दिवशी इरकलच्या काळ्या साड्या नेसल्या जातात. पण जर का तुम्ही वर्किंग वूमन किंवा कॉलेजियन असाल तर साडी नेसून काम करणे शक्य होईलच असे नाही, पण म्ह्णून तुमच्या सणाचा उत्साह कमी करून घ्यायची गरज नाही, थोडे ट्विस्ट अँड ट्रान्स करून थोडं फ्युजन करून तुम्ही तुमचा मकरसंक्रांती लूक साकारू शकाल..

काळा कुर्ता

एका काळ्या कुर्त्यावर थोडी कलरफुल ओढणी घेऊन तुम्ही हा लूक साकारू शकता. तुम्हाला कॉलेजला हे कपडे घालून जायचे असेल तर कुर्तीचा पॅटर्न थोडा फंकी ठेवावा. ऑफिस ला हे कपडे घालून जाणार असाल तर स्ट्रेट कट कुर्ता निवडा.  (Makar Sankranti 2020: तिळगूळ, तीळ वडी ते रेवड्या यंदा मकर संक्रांती दिवशी पहा कसे बनवाल हे गोडाचे पदार्थ (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Renu 💕bhosale- RAins (@renu_b_rains) on

काळा इंडोवेस्टर्न वनपीस

थोडे पोलका डॉट्स मिक्स केलेला काळा रंगाचा तुम्ही हा इंडोवेस्टर्न ड्रेस संक्रांतीसाठी निवडू शकता. यावर ऑक्सिडाइझड ज्वेलरी शोभून दिसेल.

काळा लॉन्ग गाऊन

काळया रंगाच्या प्लेन ड्रेसखाली थोडी नेहमीपेक्षा जाड रंगीत काठ असलेला लॉन्ग गाऊन तुम्हाला कम्फर्ट आणि स्टाईल एकाच वेळी साधण्याचे संधी देईल.

काळा खण टॉप आणि स्कर्ट

काळ्या रंगात उठून दिसेल स्कर्ट आणि त्यावर बॅक पॅटर्न वाला रेग्युलर टॉप असा लूक देखील तुम्ही करू शकता.

मुलांसाठी काय आहेत पर्याय?

मुलांनी काळ्या रंगाचे शर्ट घालणे नेहमीच आकर्षक दिसते असं म्हणतात, मग या सणांच्या निमित्ताने थोडं नेहमीच्याच कपड्यात ट्विस्ट आणून घालणे उत्तम ठरेल, काळ्या रंगाच्या शर्टवर पोलका डिझाईन, एखादे प्रिंटेड धोतर, किंवा कुर्ता असा लूक तुम्ही करू शकता.

मकरसंक्रांत ही प्रामुख्याने नवदांपत्यांसाठी लग्नानंतर पहिल्यांदा येणारा मकर संक्रातीचा सण खास असतो. यादिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं. त्यामुळे जर का तुमचा हा विवाहित म्ह्णून पहिलासण असेल तर आवर्जून ही सगळी हौसमौज करून घ्या. मकरसंक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!