Happy Makar Sankranti 2020 Wishes (Photo Credits: File)

Happy Makar Sankranti 2020 Marathi Wishes: हेमंत ऋतूचे दिवस हे मस्त थंडीचे दिवस, आकाशात संध्याकाळी उडणारे रंगीबेरंगी पतंग, नव्या वर्षाच्या धामधुमीपाठोपाठ येणारा मकरसंक्रात हा येणारा पहिला सण! त्यामुळे या सणाचा उत्साह देखील तितकाच असतो. अगदी लहानग्यांपासून महिलांपर्यंत सर्वांचा हा आवडीचा सण असतो. तसेच सर्वच भारतीय सण स्वत:च्या वैशिष्ट्यांमुळे खास असतात. पण या सणाची मजा काही औरच असते. हा सणाला महिलांची विशेष रेलचेल पाहायला मिळते. कारण या निमित्त तिळगूळ लाडू वाटले जाते, हळदी कुंकू केले जाते, महिलांना वाण दिले जाते. अशा या सणाची तितक्याच दणक्यात तयारी एव्हाना सुरु झाली आहे.

या सणाच्या लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते, तसेच नवविवाहित स्त्रिया हलव्याचे दागिने घालून हळदी-कुंकू करतात. विवाहित स्त्रियांना वाण दिले जाते. अशा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने अगदी साग्रसंगीत हा सण साजरा केला जातो. अशा या मंगलमयी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा:

Happy Makar Sankranti 2020 Wishes (Photo Credits: File)
Happy Makar Sankranti 2020 Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2020: मकर संक्रांती निमित्त सुरक्षितपणे पतंगबाजीचा आनंद घेण्यासाठी या टीप्स नक्की लक्षात ठेवा!

Happy Makar Sankranti 2020 Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

Happy Makar Sankranti 2020 Wishes (Photo Credits: File)
Happy Makar Sankranti 2020 Wishes (Photo Credits: File)

GIFs Images:

Subodh Bhave सांगत आहे मकरसंक्रांत साजरा करण्यामागची खरी गोष्ट : Watch Video

मकर संक्रांतीचा सण हा नवचैतन्याचा आहे. त्यामुळे या सणामध्ये रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या. या सणा दिवशी तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलून एकमेकांमधील कटुता कमी करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठी कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा