Happy Bhogi 2020 Wishes: भोगी सणाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Messages, Greetings, HD Images, Wallpaper, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्विगुणित करा सणाचा आनंद!
Bhogi HD Wishes (Photo Credits: File)

Happy Bhogi 2020 Wishes and Messages in Marathi:   महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस हा भोगी म्हणून साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांत (Makar Sankrant) 15 जानेवारी दिवशी आहे. तर भोगी सण (Bhogi) 14 जानेवारी दिवशी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी सवाष्ण महिला अभ्यंगस्नान करतात. सोबत रब्बी हंगामातील पीकाचे पूजन करून वर्षभर घरात धनधान्याची भराभराट होऊ दे यासाठी प्रार्थना केली जाते. मग नववर्षातील मकर संक्रांत सेलिब्रेशनमधील या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. त्यासाठी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, HD Images, शेअर करून भोगी सणाच्या शुभेच्छा द्या. Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

भोगी सणाप्रमाणेच उत्तर भारतामध्ये मकर संक्रांती पूर्वी उत्तर भारतामध्ये 'लोहडी' साजरी केली जाते. त्यामुळे या सूर्याच्या उत्तरायणाच्या सणाच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करा.

भोगी सणाच्या शुभेच्छा आणि मेसेजेस

आपणांस व आपल्या परिवाराला भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhogi Wishes | FIle Photo

दु: ख असावे तीळा सारखे

आनंद  असावा गुळासारखा

तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे

भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhogi Wishes | FIle Photo

संक्रांतीचा पहिला सण

'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

Bhogi Wishes | FIle Photo

भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhogi Wishes | FIle Photo

नववर्षातला पहिला सण

भोगी सणाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

Bhogi Wishes | FIle Photo

भीष्मांनी देहत्यागासाठी संक्रांतीचा म्हणजेच उत्तरायणाचा दिवस निवडला होता. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दक्षिणायनाच्या तुलनेत उत्तरायण अधिक पुण्यकारक असतं. त्यामुळे पौष महिन्यातील या सणाला विशेष महत्त्व आहे.