Sughad Pujan | File Photo

Sugad Pujan Vidhi: ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार सुरू झालेल्या नववर्षात पहिला सण हा मकर संक्रांत असतो. यंदा 2020 दिवशी सुरू झालेलं नववर्ष लीप इयर असल्याने मकर संक्रांत 15 जानेवारी दिवशी आहे. तर भोगीचा सण 14 जानेवारीला आहे. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती दिवशी तिळगूळ वाटणं, पतंग उडवणं यासोबतच सवाष्ण माहिला सुगड पूजन करतात. आनंदाची देवाण -घेवाण करणं हाच आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. मग यंदा मकर संक्रांंती दिवशी तुमच्या घरी देखील सुगड पूजन करणार असाल तर पहा त्याची पूजा कशी कराल? Happy Bhogi 2020 Wishes: भोगी सणाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Messages, Greetings, HD Images, Wallpaper, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्विगुणित करा सणाचा आनंद!

'सुघट' या शब्दाचा अपभ्रंश होऊन 'सुघड' हा शब्द निर्माण झाला आहे. 'सुघट' म्हणजे सुघटीत असा घड. या घड्यात शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे.  Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

मकर संक्राती दिवशी सुगड पूजन कसे कराल?

# सुगड पूजनासाठी पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडा. त्याच्या बाजूला रांगोळी काढून मधोमध स्वस्तिक काढा. त्यावर हळद कुंकू लावून पाट किंवा चौरंग मांडा.

# हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य 2 सुगडामध्ये ठेवा. काही ठिकाणी 5 सुगडांचंदेखील पूजन केलं जातंं.

# सुगडांवर हळदी कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळा.

# पाट/चौरंगावर लाल वस्त्र ठेवा. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. त्यावर भरलेलं सुगडं मांडा. मोठं काळं सुगडं खाली आणि त्यावर लहान लाल सुगड मांडून ठेवा.

# त्यानंतर दिवा लावा. सुगडावर हळद कुंकू वाहा. अक्षता फुलं वाहून नमस्कार करा.

# तिळाचे लाडू आणि हलवे याचा नैवेद्य दाखवा.

मकरसंक्रांती हा आनंदाचा सण आहे. या दिवशी जुने हेवेदावे मागे सोडून एकमेकांमधील कटूता कमी केली जाते. त्यासाठी हलवा, फुटाणे, तीळगुळ वाटले जातात. एकमेकांकडे जाऊन याकाळात सवाष्ण स्त्रिया वाण लूटतात. यामध्ये काही ठिकाणी सुगड दान करण्याचीदेखील प्रथा आहे. तसेच मकर संक्रांती दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. याद्वारा कोणतीही अंधश्रद्धा पसरवणं हा लेटेस्टली मराठी चा हेतू नाही)