![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/Lohri-Photos-In-Hindi-380x214.jpg)
Happy Lohri 2020 Messages and Wishes: नववर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. महाराष्ट्रासह उत्तर भारतामध्ये या सणाला विविध नावाने ओळखलं जातं. आज 13 जानेवारी दिवशी उत्तर भारतामध्ये लोहडी हा सण साजरा केला जाणार आहे. यंदाच्या हंगामातील धन धान्य आल्यानंतर त्याची पूजा करून पुढील वर्ष भर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सोबत धान्याची देखील भरभराट होत राहो यासाठी लोहडीच्या दिवशी पूजा कामना केली जाते. मग यंदा लोहडीच्या सणाच्या तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील शुभेच्छा देऊन या नव्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास ग्रीटिंग्स, इमेजेस, शुभेच्छा, एसएमएस देऊन या सणाच्या शुभेच्छा द्या. Makar Sankranti 2020: 'मकर संक्रांत' नक्की का साजरी करतात; जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व.
लोहडीच्या संध्याकाळी ढोल-नगाडे वाजवून उत्तर भारतीय एकत्र जमून नाचतात.
लोहडीच्या आगीमध्ये सुकामेवा, गूळ यांची आहुती देऊन प्रार्थना केली जाते. या सणामध्ये मित्र परिवार, कुटुंबीय यांच्यासोबत नाच -गात एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
लोहडीच्या शुभेच्छा
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/Lohri-Wishes-In-Hindi.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/1-18.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/Lohri-Messages-In-Hindi.jpg)
लोहडीचा हा सण नवजात बालकं आणि नव जोडप्यांसाठी खास असतो. यादिवशी लोहडी मातेकडे सुखी जीवनाची कामना केली जाते. लोहडी सण म्हणजे थंडीच्या हंगामाची सांगता असते. पंजाब मध्ये प्रामुख्याने या दिवसांपासून पिकांचा हंगाम सुरू होतो.