Hajj 2021: यंदाच्या वर्षी 60 हजार विदेशी नागरिकांना करता येणार हज यात्रा, सउदी सरकारने दिली परवानगी
Hajj Yatra (Photo Credits-Facebook)

Hajj 2021: यंदाच्या वर्षी विदेशातील भाविकांना हज यात्रा करण्याची परवानगी दिली जाणार आहे. सउदी गजटच्यानुसार, धार्मिक तीर्थयात्रा 2021 ही सर्वांसाठी खुली असणार आहे. मात्र कोविड19 च्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. सांप्रदायिक सद्भाव समिती मधील पंतप्रधानमंत्र्यांचे विशेष प्रतिनिधी मौलाना ताहिर अशरफी यांनी शनिवारी असे म्हटले की, सउदी अरब यंदाच्या वर्षातील हज यात्रेसाठी जगभरातील 60 हजार लोकांना हजसाठी येण्यास परवानगी देणार आहे. त्याचसोबत कोरोनाची परिस्थिती पाहता 18 वर्षाखालील आणि 60 वर्षावरील नागरिकांना मात्र येण्यास परवानगी नसणार आहे.

यामध्ये भारतातील लोक सुद्धा सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षात कोरोनाच्या महासंकटामुळे हज यात्रा रद्द करण्यात आली होती. फक्त 1 हजार भाविकांना यात्रा करण्यास परवानगी दिली होती. यापूर्वी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, कोरोनामुळे यंदाची हज यात्रा होणार नाही आहे. हज यात्रा ही जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी एक महत्वपूर्ण पर्व असते. ज्यामध्ये जवळजवळ सर्वच मुस्लिम बांधव आपल्या आयुष्यात एकदातरी हज यात्रेला येऊ पाहतात. धार्मिक रुपात सर्व मुस्लिम बांधवांसाठी हे अनिवार्य असून आर्थिक स्थिती योग्य असल्यास त्यांनी ही यात्रा करावी.(Hajj : 'Muslim 3D' सोबत आता हज यात्रेचा अनुभव आता व्हर्च्युअल टूर माध्यामातूनही घेता येणार!)

हज यात्रेचे महत्व-

कुरान मध्ये इस्लाम मधील पाच स्तंभाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, शहादा, सलात (नमाज), जकात (दान), सौम (रोजा) आणि हज करणे. मक्का आणि मदीना हे इस्लामिक धर्मात सर्वाधिक पवित्र मानले जाते. त्यांना इस्लाम धर्माचे जन्मस्थान असल्याचे असे ही म्हटले जाते. मक्का असे एक शहर आहे जेथे पहिल्यांदा नमाज अदा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. हज इस्लामिक कॅलेंडरच्या 12व्या महिन्यात म्हणजेच जिलहिज्जाच्या आठव्या ते 12 व्या तारखेपर्यंत करण्यात येते.

हज यात्रिकरुंना सफा आणि मरवा नावाच्या दोन डोंगरांच्या मध्ये सात फेर्या माराव्या लागता. सफा आणि मरवा दरम्यान पैगंबर इब्राहिम यांच्या पत्नीने आपला मुलगा इस्माइलसाठी पाणी शोधून काढले होते. त्यानंतर मक्का येथून जवळजवळ 5 किमी दूर मिना येथे सर्व हाजी जमतात आणि नमाज अदा करतात. पुढील दिवशी अरफात नामी या ठिकाणी जात मैदानात दुआचे खास महत्व असते. अराफात येथून मिना येथे परतल्यानंतर हज यात्रिकरुंना दानवाच्या रुपात बनलेल्या तीन खांबांवर दडग मारावे लागतात. हे कार्य अशा गोष्टीचे प्रतीक मानले जाते की, मुस्लमान अल्लाहच्या आदेशाच्या पुढे दानवाला अडथळा आणू देणार नाही.