Guru Hargobind Sahib Ji Parkash Purab 2021 HD Images: गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या प्रकाश पर्व च्या शुभ दिनी पाठावा हे WhatsApp Stickers, Facebook Messages आणि GIF Greetings
गुरु हरगोबिंद जी प्रकाश पर्व 2021 (Photo Credits: Twitter)

Guru Hargobind Sahib Ji Parkash Purab 2021 HD Images: आज शीखांचे सहावे गुरू,हरगोबिंदसिंग जी यांचा प्रकाश पर्व साजरा केला जात आहे. नानक शाही पंचांगच्या म्हणण्यानुसार, गुरु हरगोबिंद सिंह जी यांचा जन्म आषाढ (वदी 6) संवत 1652 (19 जून 1595) ला अमृतसर च्या वडाली गावात गुरु अर्जन देव यांच्या घरी झाला होता. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी सन 1606 मध्ये गुरु साहिब गुरुगद्दी वर आसीन झाले होते. गुरुगद्दीवर बसल्यानंतर त्यांनी पारंपारिक पोशाखासह दोन तलवारी हाती घेतल्या आणि डोक्यावर दास्ताने सुशोभित केले आणि राजासारखे शिवले घातले. त्यांनी स्वत: शस्त्रे हाती घेतली आणि सैन्य स्थापन केले, ज्यात मजबूत आणि समर्पित सैनिक समाविष्ट होते. (Karnataki Bendur 2021 HD Images: कर्नाटकी बेंदूर सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी एचडी इमेज, WhatsApp Status, Wishes, Facebook Messages इथून करु शकता डाऊनलोड)

गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या प्रकाश पर्व च्या शुभ मुहूर्तावर गुरुद्वारांमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यासह गुरु ग्रंथ साहिबचे पठण केले जाते आणि गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन केले जाते.या खास प्रसंगी शीख समाजातील लोक एकमेकांना शुभेच्छा देतात.आपणही या शुभ दिनी आपल्या परिवार आणि मित्रजनांना खाली दिलेले एचडी इमेजेस, वॉट्सऐप स्टिकर्स, फेसबुक मेसेज, GIF इमेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

गुरु हरगोबिंद जी प्रकाश पर्व 2021 (Photo Credits: Twitter)
गुरु हरगोबिंद जी प्रकाश पर्व 2021 (Photo Credits: Twitter)
गुरु हरगोबिंद जी प्रकाश पर्व 2021 (Photo Credits: Twitter)
गुरु हरगोबिंद जी प्रकाश पर्व 2021 (Photo Credits: Twitter)
गुरु हरगोबिंद जी प्रकाश पर्व 2021 (Photo Credits: Twitter)

असे म्हटले जाते की, एकदा जंगलात शिकार करत असताना जहांगीर यांच्यावर सिंहाने आक्रमण केले होते, त्यानंतर आपली शक्ती दर्शविताना गुरु हरगोबिंद साहिब यांनी तलवारीच्या एका झटक्याने सिंहाचे तुकडे करुन जहांगीरचा जीव वाचविला.त्यानंतरच जहांगीरने तुरुंगात असलेल्या 52 स्थानिक राजांना सोडले होते. गुरु हरगोबिंद जी यांचा गुरुकाल 38 वर्षांचा होता , ज्यामध्ये शीख पंथासाठी बराच प्रचार आणि प्रसार केला गेला.