माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील गुप्त नवरात्रीला (Gupt Navratri) आजपासून सुरूवात होत आहे. चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणे आषाढ आणि माघ महिन्यात गुप्त नवरात्र साजरी करण्याची प्रथा आहे. पारंपारीक मान्यतांनुसार विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी गुप्त नवरात्रीमध्ये गुप्त पद्धतीने पूजा-पाठ करण्याची प्रथा आहे. यामध्ये भगवती कालीच्या रूपासोबत 10 महाविद्यांची पूजा केली जाते. यंदा माघी नवरात्र किंवा गुप्त नवरात्र ही 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2021 पर्यंत चालणार आहे.
माघ नवरात्रीमध्ये पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा तिथी 12 फेब्रुवारी दिवशी 12.35 मिनिटांनी सुरू होणार असून 13 फेब्रुवारी पर्यंत 12.29 पर्यंत असणार आहे. तर घटस्थापनेसाठी पूजा आज (12 फेब्रुवारी) दिवशी 12.13 ते 12.58 या वेळेत केली जाऊ शकते.
गुप्त नवरात्रीमध्ये माता कालिका,तारा देवी,त्रिपुर सुंदरी,भुवनेश्वरी,माता चित्रमस्ता,त्रिपुर भैरवी,माता धूम्रवती,माता बगलामुखी,मातंगी,कमला देवी यांची पूजा केली जाते. कोल्हापूरची अंबाबाई , माहूरची रेणुकादेवी, सप्तशृंगी आणि तुळजापूरची तुळजाभवानी; महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास आहे खास, जाणून घ्या.
इतर नवरात्रींप्रमाणे गुप्त नवरात्र घराघरांमध्ये केली जात नाही. गुप्त नवरात्री ही विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी केली जाते. तांत्रिक विशेष रूपाने या गुप्त नवरात्रीमध्ये साधना करतात. या नवरात्रीमध्ये केले जाणारे विधी, पूजा, मंत्र, पाठ आणि प्रसाद देखील गुप्त ठेवला जातो. नावाप्रमाणे यामध्ये गुप्तता पाळली तर साधना यशस्वी होते असा मानस आहे.
तंत्र विद्यामध्ये रूची ठेवणारे साधक आणि मांत्रिक प्रामुख्याने गुप्त नवरात्री पाळतात. प्राचीन काळात गुप्त नवरात्र विशेष होती. मात्र जसा काळ बदलला तशी आता समाजात सजगता आली आहे. देवीच्या रूपाचं पूजन करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र साजरी केली जाते.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या हेतूने लिहला आहे. लेटेस्टली यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.