महाराष्ट्रामध्ये मराठी नववर्षाची सुरूवात गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा (Chaitra Shuddh Pratipada) दिवस हा मराठी बांधवांसाठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. शालिवान संवत्सराचा पहिला दिवस म्हणून महाराष्ट्रासोबतच भारतामध्ये इतरही काही राज्यांमध्ये या निमित्ताने खास सेलिब्रेशन केले जाते. महाराष्ट्रात मराठी बांधव गुढीपाडव्याला घरा-घरात गुढी उभारून तर सार्वजनिक स्तरावर शोभायात्रांचं आयोजन करून हा दिवस साजरा करतात. मग जाणून घ्या यंदा गुढीपाडव्याचा सण नेमका कोणत्या दिवशी साजरा केला जाणार?
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवसाचं मराठी बांधवांसाठी खास आकर्षण असतं. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 22 मार्च 2023 दिवशी आहे. हा दिवस चैत्र मासारंभ आहे. यंदा या दिवसापासून शालिवाहन शके 1445 ची सुरूवात होणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Cabinet Meeting: गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा.
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने या निमित्ताने घरावर मांगल्याचं प्रतिक म्हणून गुढी उभारली जाते. त्याची साग्रसंगीत पूजा केली जाते. गुढीला हार, कडुलिंबाचा पाला, बत्ताशाची माळ घातली जाते. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवली देखील जाते. या दिवसाचं औचित्य साधत आता संस्कृतीचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी शोभायात्रांचं आयोजन केले जाते. या शोभायात्रांमध्ये रांगोळ्या काढल्या जातात. लूप्त होत असलेल्या अनेक संस्कृती, रूढी, परंपरा पुढल्या पिढीसमोर ठेवल्या जातात.
गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या सेलिब्रेशनला सुरूवात होते तसेच चैत्र नवरात्र देखील सुरू होते. त्यामुळे या दिवसाचं सेलिब्रेशन सार्या मराठी बांधवांसाठी खास असतं.