Gauri Haldi Kunku Invitation In Marathi Text: : गणपतीच्या दिवसांमध्ये माहेरवाशिणींना खास ओढ असते ती गौराई पूजनाच्या (Gauri Pujan) दिवसाची. यंदा 10 सप्टेंबरला गौराई आणल्यानंतर आज 11 सप्टेंबरला गौरी पूजन केले जाणार आहे. माहेरवाशिणी या दिवशी घरात एकत्र जमून रात्र जागवतात. कोकणामध्ये ओवसं दिली जातात. रात्री सार्या सख्या मिळून फुगडी, झिम्मा सारखे खेळ खेळतात. गौराई पूजनामध्ये पार्वती बाल गणेशाला आपल्या घरी पुन्हा घेऊन जाण्यासाठी येते अशी धारणा आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने अनेह सुवासिनी महिला माहेरी येतात. मग या गौराई पूजनाच्या निमित्ताने तुमच्या मैत्रिणींना देखील हळदी कुंकवासाठी आमंत्रित करण्यासाठी, एकत्र गौरी पूजनाचा दिवस घालवण्यासाठी बोलवण्यासाठी खास आमंत्रण पत्रिका, आमंत्रणाचे मेसेजेस तुम्ही Facebook, WhatsApp, Instagram द्वारा शेअर करू शकता.
भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना गौरी आवाहन म्हणजे गौरी आणल्या जातात. ज्येष्ठा नक्षत्रावर त्या पुजल्या जातात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असतांना त्यांचे विसर्जन केले जाते. गौरी पूजनाला सौभाग्यवतींसाठी खास असणारं ओवसाचं सूप कसं तयार करतात? जाणून घ्या पुजाविधी.
गौराई पूजन आणि हळदी कुंकू मेसेजेस
गौराई पूजन निमंत्रण 1:
सस्नेह आमंत्रण
सालाबात प्रमाणे यंदाही आमच्या कडे 10 सप्टेंबरला गौराई चं आगमन आणि 11 सप्टेंबरला गौरी पूजन होणार आहे. तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला आणि गौराई पूजनाला आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण !
गौरी पूजन -
तारीख : 11 सप्टेंबर
वेळ: सकाळी 10 वाजल्यापासून
पत्ता-
गौराई पूजन निमंत्रण 2:
गौराई पुजनाच्या दिवशी आज तुम्हा सख्यांसोबत हळदी कुंकवाचा आणि झिम्मा फुगड्यांचा खेळ खेळत आनंद घेण्यासाठी अवश्य भेट द्या आमच्या घरी!
वेळ: संध्याकाळी 7 वाजल्यापासून
पत्ता-
गौराई पूजन निमंत्रण 3:
ज्येष्ठा गौरी पूजनाचा दिवस आज आनंदाचा, सया सख्यांसोबत खेळ खेळू झिम्मा फुगड्यांचा ....
आज सलाबादाप्रमाणे माझ्या सार्या सख्यांसाठी ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवस खास माहेरवाशिणींचे लाड पुरवण्यासाठी हळदी कुंकू आणि पारंरिक खेळ खेळत रात्र जागवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आपण अवश्य गौरी-गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जरूर या!
पत्ता-
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिवशी गणपती सोबत गौरीची पूजा केली जाते. विवाहित स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांचे कल्याण करण्यासाठी तीन दिवस उपवास करतात. मान्यतेनुसार, या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी, माता पार्वती कैलास पर्वतावरून पृथ्वीवर अवतरली होती. या दिवशी श्रीगणेशाप्रमाणेच माता गौरीची मूर्तीही मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात घरी आणली जाते. त्यानंतर तीन दिवसांनी गौराईचे विसर्जन केले जाते.