Gatari 2020 Wishes in Marathi: श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. दिव्याची अमावास्येचं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या 'गटारी अमावस्या' म्हणून साजरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.
यंदा 20 जुलै दिवशी आषाढी अमावस्या (Aashadh Amavasya) असल्याने 19 जुलै, रविवार दिवशी गटारी म्हणजेच मांसाहारींना मासे, चिकन, मटण यांच्यावर ताव मारण्यासाठी शेवटची संधी आहे. अलिकडे सोशल मीडियावरही गटारी अमावस्येची खूपच धूम असते. लोकं व्हॉट्स अॅप, फेसबुकवर आणि इतर सोशल साईट्सवर गटारीचे कार्टून, विनोद, शुभेच्छा शेअर करत असतात. त्यामुळे या गटारी अमावस्येचे निमित्त खालील मराठी संदेश, Images, WhatsApp Status, Messages द्वारे मासांहार करणाऱ्यांना मित्र मैत्रिणींना मजेशीर शुभेच्छा नक्की द्या! (हेही वाचा - Shravan Somvar 2020 Date: शिवभक्तांसाठी खास असलेले श्रावणी सोमवार यंदा कधी? पहा, कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?)
मौसम मस्ताना,
सोबत सर्व मित्र परिवार असताना,
साजरी करा गटारी अमावस्या लॉकडाऊन असताना
गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
पाऊले चालती बिअर बारची वाट,
जाताना सुसाट, येताना तराट
अजून आला नाही का घरात,
अरे पडलास की काय गटारात!
गटारी अमावास्येच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
गटारी अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
सणात सण गटारीचा सण,
अरे तळीरामा आता तरी बस म्हण!
गटारी अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
आली आली गटारी,
गटारी सणाची मजाचं न्यारी
एकाच दिवसात लुटून घ्या
वर्षभराची मज्जा सारी
गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!
गटीरी अमावस्या साजरी करण्यामागे मोठा इतिहास आहे. संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. श्रावण न पाळणाऱ्यासाठीदेखील ही एक प्रकारची पर्वणीच असते.