Ganeshotsav 2021 Guidelines: घरगुती गणपतीची मूर्ती 2 फूटांची असावी; 'गणेशोत्सवा'साठी राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
सध्या तर देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे व पुढे तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. राज्यात कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, शासनाने या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
प्रत्येकवर्षी मराठी व्यक्ती ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असते, तो म्हणजे गणेशोत्सव (Ganeshotsav 2021)! यंदा 10 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतरचे पुढील दहा दिवस उत्साहाने, आनंदाने, हास्याने भारलेले असतील. मात्र यावर्षीही या उत्सवावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट आहे. सध्या तर देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे व पुढे तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. राज्यात कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, शासनाने या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात सार्वजनिक गणपती मंडळे अगदी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. या दहा दिवसांमध्ये पुण्या-मुंबई सारख्या शहरांचे तर संपूर्ण रूपच पालटते. मात्र यंदाही अशा मंडळांवर अनेक मर्यादा आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारने पुढील मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत -
- सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना पालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या धोरणारणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल.
- महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
- घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यामध्ये भपकेबाजी नसावी.
- गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूटांची आणि घरगुती गणपतीकरीता 2 फूटांची असावी.
- यंदा पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवरी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती जर का शाडूची असेल तर त्याचे विसर्जन शक्यतो घरी करावे. ते शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.
- जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
- सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम/शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे.
- राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील. गणेशोत्सवादरम्यान यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. (हेही वाचा: ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीत 4 जुलै पर्यंत संचारबंदी लागू)
- आरती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी होणार याची दक्षता घ्यावी. तसेच तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियम आणि तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.
- श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
- गणपतीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था असावी. मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझर पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
- श्रींचे आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरी करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ व्यतीत करावा.
- संपूर्ण चाळींतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रित्या काढण्यात येऊ नये.
- महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2021 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

