Ganesh Jayanti | Photo Credits: Instagram

Ganesh Jayanti 2021: विघ्नहर्ता श्रीगणेशाचे भक्त गणेश चतुर्थीप्रमाणेचं त्यांच्या जयंतीची वाट पाहत असतात. हिंदी पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान गणेश यांचा जन्म झाला होता. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघी विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. आज म्हणजेचं सोमवार, 15 फेब्रुवारी रोजी सर्वत्र गणेश जयंती साजरी होत आहे. आज या लेखात आपण गणेश जयंती मुहूर्त, तारीख आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊयात...(वाचा - Maghi Ganesh Jayanti 2021 Guidelines: माघी गणेश जयंती निमित्त राज्य सरकार कडून मार्गदर्शक सूचना जाहीर, 'या' नियमांचे करावे लागणार पालन)

गणेश जयंती 2021 मुहूर्त -

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 14 फेब्रुवारी रोजी रविवारी रात्री 01:58 वाजता सुरू होईल, जी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 03:36 मिनिटांनी समाप्त होईल. अशाप्रकारे, यावर्षी गणेश जयंती 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.

गणेश जयंती 2021 पूजा मुहूर्त -

गणेश जयंतीच्या दिवशी दुपारी गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी तुम्हाला एकूण 02 तास 14 मिनिटे मिळतील. या दिवशी आपण सकाळी 11:28 ते दुपारी 01:43 दरम्यान गणेश पूजा करू शकता. यावर्षी रवि योगात गणपती बाप्पांचे पूजन होईल आणि त्यांची जयंती साजरी केली जाईल. गणेश जयंतीच्या दिवशी रवि योग सकाळी 06:59 ते संध्याकाळी 06:29 पर्यंत आहे.

गणेश जयंती महत्त्व -

गणेश जयंती दिनाचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजन करतो, त्याला गणेश चतुर्थीचे फळ मिळते. तसेच त्या व्यक्तीला मरणानंतर मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीच्या दिवशी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह देशभरातील गणेश मंदिरांमध्ये गणपतीची जयंती साजरी केली जाते.

या दिवशी चंद्राचे दर्शन करू नका -

गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे माघी गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे. या दिवशी चंद्र पाहणार्‍याला मानसिक त्रास सहन करावा लागतो.

या वेळेत चंद्र पाहू नका -

गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रोदय सकाळी 9.14 वाजता तर चंद्रस्त रात्री 9:32 वाजता होईल. अशा परिस्थितीत आपण चंद्र पाहणे टाळावे.

टीप - या लेखातील कोणतीही माहिती अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी देत नाही. ही माहिती आपल्याला विविध माध्यमांद्वारे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचने / श्रद्धा / धर्मग्रंथांतून देण्यात आली आहे. आमचा हेतू ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविणे एवढाचं आहे. वापरकर्त्यांनी त्यास केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावे. यास वापरकर्त्याने सल्ला समजू नये.