Maghi Ganesh Jayanti 2021 Guidelines: कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे धार्मिक ते लग्नसमारंभासारखे मोठे सोहळे अत्यंत साधेपणाने साजरे करावे असे आवाहन राज्य सरकारने गेले होते. परंतु जसा लॉकडाऊन हळूहळू शिथील करण्यात आला तसा काही गोष्टी करण्यास परवानगी दिली गेली आहे. परंतु त्यासाठी सुद्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अशा सुचना दिल्या गेल्या आहेत. अशातच आता येत्या 15 फेब्रुवारीला साजरा केल्या जाणाऱ्या माघी गणेश जयंती निमित्त राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.(Ganesh Jayanti 2021 Date: माघी गणेश जयंती यंदा 15 फेब्रुवारीला; जाणून घ्या गणेश भक्तांसाठी खास असलेल्या या दिवसाचं महत्त्व!)
गणपतीचा जन्मदिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली जाते. विविध ठिकाणी मिरवणूका सुद्धा निघतात. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही नियमांचे पालन करावे लागणार हे नक्कीच. त्याच संदर्भातील सुचना राज्य सरकारने जहीर केल्या आहेत.(Maghi Ganesh Jayanti 2021 Invitations: माघी गणेश जयंती निमित्त घरी बाप्पाच्या दर्शनाला पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, HD Images)
-माघी गणेशोत्सवासाठी आगमन किंवा विसर्जनासाठी मिरवणूक काढू नये. त्याचसोबत मंडप सुद्धा मर्यादित उभारावेत.
-यंदाच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता गणपतीच्या मुर्तीऐवजी धातू किंवा संगमरवाराच्या मुर्तीची पूजा करावी.
- शाडूची मूर्ती असेल तर शक्यतो घरच्या घरीच त्याचे विसर्जन करावे.
-सार्वजनिक मंडळाने 4 फूट आणि घरगुती गणपतीची मुर्ती 2 फूट असावी.
-माघी गणेश जयंती निमित्त रक्तदान शिबीर, आरोग्यासंबंधित शिबीरांचे आयोजन करावे.
-मंडपात एकाचवेळी 10 पेक्षा अधिक जणांनी जमा होऊ नये.
महाराष्ट्रात गणपतीच्या अष्टविनायकांसोबतच मुंबईतील सिद्धिविनायक गणपती सह अनेक गणेश मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहाने गणेश जयंती साजरी केली जाते. घरामध्ये गणेश जयंती साजरे करणारे अनेक भाविक यानिमित्ताने बाप्पाचे आवडते मोदक तीळ-गुळाच्या सारणामध्ये करतात. नैवेद्यामध्येही तीळाचा समावेश हमखास केला जातो.