
वर्षभर गणेशभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो म्हणजे गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) दिवस. यंदा 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. 2 वर्षांचं कोविड 19 चं संकट दूर सारून यंदा पुन्हा जल्लोषात, मंगलमय वातावरणामध्ये आणि निर्बंधमुक्त परिस्थितीमध्ये हा सण साजारा केला जात आहे. मग या मंगलपर्वाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आप्तेष्टांना देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Gifs, HD Images, WhatsApp Status द्वारा शेअर करून गणेशोत्सवाची चैतन्यमय वातावरणामध्ये सुरूवात करू शकता.
सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणपतीच्या मूर्तीचं आगमन करून विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर बाप्पा दीड दिवस ते 10 दिवस विराजमान होतात आणि नंतर पुन्हा आपल्या गावी परतात. महाराष्ट्रात गणेशोत्सवामध्ये काही घरांमध्ये गौराई चं देखील आगमन होते. त्यामुळे गौरी-गणपतीच्या सणाचे हे 7 दिवस मोठ्या धामधुमीचे असतात. हे देखील नक्की वाचा: Ganpati Invitation Messages Format In Marathi : गौरी-गणपती आमंत्रण मित्रमंडळी, आप्तांना देऊन यंदा बाप्पाच्या दर्शनाला त्यांना घरी बोलावण्यासाठी WhatsApp Messages!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष,उल्हास, सुख, समृद्धी,
ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे..
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातला
आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
अडचणी उंदराइतक्या लहान असो
आयुष्य सोंडे इतके लांब असो
क्षण मोदका इतके गोड असो
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदरा चा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होती उदास
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुझं मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरून
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
गणेश चतुर्थी हा सण महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राबाहेरही भाविक मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यानिमित्ताने घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनाला भाविक मंडळी जातात. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात समाजाला एकत्र आणण्यासाठी घराघरात बसणारा गणपती सार्वजनिक ठिकाणी देखील बसवायला सुरूवात केली आणि आज स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली असली तरीही या सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम आहे.
गणेश चतुर्थीला बाप्पाची पूजा करून त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी दुर्वा, जास्वंद, केवडा बाप्पाला अर्पण केला जातो.