गणपती आमंत्रण पत्रिका । File Photo

गणेशोत्सवाची धामधूम यंदा जोरात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच आता घरगुती गणेशोत्सवामध्ये निर्बंधमुक्त वातावरणामध्ये यंदाचा गौरी-गणपतीचा सण पार पडणार आहे. अशामध्ये आता तुमच्या घरी नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तांना बाप्पांच्या दर्शनासाठी आमंत्रित करण्यासाठी निमंत्रण पाठवण्यासाठी फेसबूक मेसेजेस किंवा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस द्वारा मेसेज करू शकता. तुमचं काम थोडं हलकं करण्यासाठी आम्हीच काही गौरी गणपती आमंत्रण पत्रिका मेसेज (Gauri Ganpati Invitation) फॉर्मेट्स तयार केले आहेत. ते वापरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे मेसेज आप्तांना फॉर्वर्ड करू शकता.

यंदा गणपतीचं आगमन 31 ऑगस्ट दिवशी होणार आहे. त्यानंतर घरातील रीतीभातीनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांचा गणपती घरांमध्ये तर 10 दिवसांचा गणपती सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होतात. गौरी-गणपतीच्या सणामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यानुसार तुम्ही ही आमंत्रणं पाठवू शकता. नक्की वाचा: Ganeshotsav 2022 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवातील पहा महत्त्वाच्या सणांच्या तारखा! 

गणेशोत्सव 2022 आमंत्रण पत्रिका

गणपती आमंत्रण पत्रिका । File Photoकोरोनाचे विघ्न दूर हारूनी

यंदा पुन्हा बाप्पाचा जयघोष करूया

आमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की या !

पत्ता -

आरतीची वेळ -

------------------------

गणपती आमंत्रण पत्रिका । File Photo

सस्नेह आमंत्रण

सालाबात प्रमाणे यंदाही आमच्या कडे 31 ऑगस्टला गणरायाचं आणि 3 सप्टेंबरला गौराई चं आगमन होणार आहे. तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण !

गौरी पूजन -

तारीख : 4 सप्टेंबर

वेळ: सकाळी 10 वाजल्यापासून

पत्ता-

गणपती आमंत्रण पत्रिका । File Photo

गणेशोत्सव  2022 आग्रहाचं आमंत्रण

सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरी

३१/८/२०२२ वार  बुधवार या दिवशी

आपल्या लाडक्या बाप्पाचे

आगमन होणार आहे.

तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार

येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा!

विनित,

--------------------

गणेशोत्सव यंदा कोविड 19 चं संकट कमी झाल्याने दोन वर्षांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यामुळे घराघरात मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. मागील दोन वर्ष अनेक घरात ऑनलाईन माध्यमातून मित्रमंडळींना, आप्तांना बाप्पाचं दर्शन देण्यात आलं होतं आता मात्र पुन्हा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एकमेकांच्या भेटी गाठी घेता येणार आहेत.