Devi Gauri (Photo Credits-Facebook)

मागील 2 वर्ष सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव देखील अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा मात्र कोविडची बंधनं नसल्याने मोकळ्या वातावरणामध्ये हा किमान दीड दिवसांचा घरगुती गणेशोत्सव आणि 10 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात पार्थिव गणेश पूजा अर्थात भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव (Ganeshotsav )लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र जमवण्यासाठी सार्वजनिक स्वरूपातही साजरा करण्यास सुरूवात केली. आता घरांसोबतच सार्वजनिक मंडळांमध्येही मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करतात. गौरी गणपतीचे 7 दिवस विविध सण साजरे केले जातात. पहा गणेशोत्सवातील हे प्रमुख सणाचे दिवस आणि त्याच्या मुहुर्त वेळा काय? नक्की वाचा: Ganesh Chaturthi E-Invitation Card Format in Marathi: गणेशोत्सवात प्रियजणांना घरी आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका'. 

हरितालिका

हरितालिके दिवशी शिव पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा 30 ऑगस्ट दिवशी हरितालिका पूजन केले जाईल. या दिवशी इच्छित वर मिळावा म्हणून कुमारिका आणि स्त्रिया दिवसभर उपवास करतात.

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी यंदा 31 ऑगस्टला साजरी केली जाईल. या दिवशी पार्थिव गणपती पूजन करण्याची प्रथा आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपती यांची या दिवशी प्राणप्रतिष्ठा होते. हे देखील नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2022 Date: गणेश चतुर्थीची तारीख, तिथी, पूजा पद्धत, मुहूर्त आणि पूजा साहित्य यादी, जाणून घ्या.

ऋषीपंचमी

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंचमी ही ऋषिपंचमी असते. यंदा 1 सप्टेंबर दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाणार आहे.

ज्येष्ठा गौरी आवाहन

ज्येष्ठा गौरी आवाहन यंदा 3 सप्टेंबर दिवशी होणार आहे. या दिवशी रात्री 10.56 पर्यंत आगमन होऊ शकते.

ज्येष्ठा गौरी पूजन

ज्येष्ठा गौरी पूजन यंदा 4 सप्टेंबर दिवशी होणार आहे. या दिवशी सवाष्ण महिला गौरी पूजन करुन एकमेकींना ओवसं देतात.

ज्येष्ठा गौरी आणि गणपती विसर्जन

यंदा ज्येष्ठा गौरी आणि गणपती विसर्जन 5 सप्टेंबरला होणार आहे. घरगुती 5 दिवसाचे आणि गौरी-गणपती विसर्जन देखील गणपती एकाच दिवशी विसर्जित होतील. रात्री 8.5 पर्यंत हे विसर्जन केले जाऊ शकतं.

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशीचा सण यंदा 9 सप्टेंबर दिवशी आहे. अनंत चतुर्दशी हे व्रत श्रीकृष्णाने युधिष्ठीराला दिले होते त्याच्या प्रीत्यर्थ हे व्रत केले जाते.

गणेशोत्सवामध्ये गणपतीचं पूजन दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस पूजा करून नंतर त्यांचं विसर्जन करण्याची प्रथा आहे. सार्वजनिक मंडळाचे गणपती 10 दिवसांचे असणार  आहे. यंदा कोविडचं सावट नसल्याने आगमन आणि विसरजन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.