
Ganapati Photos Free Download For Ganesh Jayanti 2024: गणपती (Ganapati) हे महाराष्ट्रीय लोकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने होते. महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा होतो. यासह दर महिन्याला संकष्टी चतुर्थी आणि अंगारखी चतुर्थीसारखे दिनही भक्तिभावाने साजरे होतात. गणपतीशी निगडीत अजून एक मोठा सण राज्यात साजरा होतो, तो म्हणजे ‘गणेश जयंती’ (Ganesh Jayanti 2024). यंदा मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी होणार आहे.
श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. म्हणून हा दिवस गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते.
या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते. गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून ढुंढिराजाचे पूजन करावे आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. प्राचीन प्रथांनुसार, गणेश जयंती तसेच गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई, अष्टविनायक मंदिरे या ठिकाणी मोठ्या थाटामाटात गणेश जयंतीचा उत्सव साजरा होतो. यासह इतर गणपती मंदिरांमध्येही या दिवशी विशेष पूजा-अर्चना होते. (हेही वाचा: Tilkund Chaturthi 2024 Date: यंदा तिलकुंद चतुर्थी 12 फेब्रुवारीला; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व!)
तर, माघी गणेश जयंतीनिमित्त मोफत डाउनलोड करा गणपतीचे काही खास फोटो-








दरम्यान, पौराणिक कथेनुसार गणपतीने असुराचा वध करण्यासाठी तीनवेळा वेगवेगळे अवतार घेतले. त्यामुळे या तीनही अवतारांचे तीन वेगवेगळे जन्मदिवस साजरे केले जातात. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘पुष्टिपती विनायक जयंती’ म्हणून साजरा केला जातो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘गणेश चतुर्थी’ म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा होतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘गणेश जयंती’ म्हणून साजरा केला जातो.