अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांनी धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जावू लागला. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केले, अशी बौद्ध धर्मियांची मान्यता आहे. म्हणूनच या दिवसाला 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून संबोधले जाते. दरवर्षी या दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मराठी संदेश, Wishes, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन बौद्ध बांधवांना शुभेच्छा देऊ शकता.
इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये सम्राट अशोका यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे हा दिवस 'अशोक विजयादशमी' म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. आंबेडकरांनी देखील नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. यामुळेच तेव्हापासून नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.