Eid Moon Sighting in Kerala, Chand Raat 2019 : केरळ राज्यात आज होऊ शकतं चंद्र दर्शन
chand-raat-2019

Eid Moon Sighting in Kerala, Chand Raat 2019: इस्लामी कँलेंडरनुसार ईद साजरी केली की रमजान महिना पूर्ण होतो. रमजान महिन्याच्या अखेरच्या पर्वात मुस्लिम बांधवांना ओढ लागते ती चंद्र दर्शन घडण्याची. यंदाच्या वर्षी केरळ राज्यात हे चंद्र दर्शन बुधवार म्हणजेच 5 जून 2019 रोजी घडेन. त्यामुळे 5 जुन रोजी हे चंद्र दर्शन पाच मे रोजीच साजरी होईल. शवालच्या चंद्र दर्शनादिवशी ईद-उल-फितर साजरी होते आणि रमजान समाप्त होतो. या ईदला गोड ईद असेही म्हटले जाते.

दरम्यान, आखाती देशांमध्ये (UAE, Bahrain, KSA, Qatar, Kuwait) हे चंद्र दर्शन सोमवारी सायंकाळी होऊ शकते. सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये 5 मे पासून रमजान सुरु झाला होता. इस्लाममध्ये लुनार कॅलेंडर (चंद्र दिनदर्शिका) असते. या कॅलेंडर नुसार महिना हा 29 किंवा 30 दिवसांचा असतो. चंद्र दर्शन होताच नव्या महिन्याची सुरुवात होते. भारताचा शेजारी देश पाकिस्तानने 5 जून रोजी जाहीर केले आहे की, देशभरात ईद 5 जूननंतरच साजरी केली जाईल. (हेही वाचा, LIVE Eid Moon Sighting in Middle East, Chand Raat 2019 LIVE: आखाती देशांमध्ये आज दिशू शकतो ईदचा चांद; इथे पाहा ताज्या अपडेट)

रमजान ईद अथवा ईद-उल-फितर फितर मुस्लिम समुदायाचा सर्वात मोठा सण असतो. या काळात पहाटे नमाज अदा केली जाते. या काळात सर्वाधिक लोक हे ईदगाह मध्ये जाऊन नमाज अदा करणे पसंत करतात. या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी, नातेवाईकांचे एकमेकांना भेटणे, मित्र-परिवारासोबत आनंदाची देवाणघेवाण होते. लहान थोर आणि महिला मोठ्या आनंदात असतात. बोहरी समाजाचे लोक 4 जून रोजी ईद साजरी करणार आहेत.