सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेला चांद अखेर सौदी अरेबिया देशात दिसला आहे. त्यामुळे आखाती देशात उद्या ईद साजरी होणार आहे.

अद्यापही चांद न दिसल्याने ईदसाठी प्रतिक्षाच करावी लागत आहे. ईदची तयारी जय्यद झाली असतानाही चंद्र दर्शन न होणे हे उत्सुकता वाढवणारे आहे.

 सौदी अरब येथील सर्वेच्च न्यायालयाने जाहीर केले आहे की, ज्याही कोणा व्यक्तीला पहिल्यांदा चंद्रदर्शन होईल त्या व्यक्तीने जवळच्या न्यायालयात जाऊन ही माहिती द्यावी.

ईदच्या जल्लोषासाठी जगभरात जय्यद तयारी करण्यात आली आहे. मात्र, सर्वांनाच उत्सुकता आहे ती, चंद्र दर्शनाची. अद्याप तरी चंद्र दर्शन घडले नाही. त्यामुळे ही उत्सुकता कायम आहे.

आखाती देशामध्ये आज ईचा चांद दिसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर जगभरातील अनेक देशांचे लक्ष आखाती देशांकडे लागून राहिले आहे. 

Eid Moon Sighting in Middle East, Chand Raat 2019: जगभरातील इस्लाम धर्मिय बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना समाप्तीच्या टप्प्यात आला आहे. आकाशात चंद्र दर्शन होताच रमजान महिना समाप्त होईल आणि शवालचा महिना सुरु होईल. रमजानचा महिना संपला की 1 शवाल रोजी ईद-उल-फितर साजरी केली जाते. या ईदला गोड ईद म्हणूनही ओळखले जाते. रमजान महिन्याच्या संपूर्ण काळात मुस्लिम बांधव आपल्या प्रिय अल्ला प्रति रोजा (उपवास ) ठेवतात. रमजानचा संपूर्ण महिना आनंद आणि उत्साहाने भारलेला असतो. अशा या महिना चंद्रदर्शनाने समाप्त होतो. आखाती देशांमध्ये (UAE, Bahrain, KSA, Qatar, Kuwait) हे चंद्र दर्शन सोमवारी सायंकाळी होऊ शकते.

दरम्यान, सौदी अरब येथील सर्वेच्च न्यायालयाने जाहीर केले आहे की, ज्याही कोणा व्यक्तीला पहिल्यांदा चंद्रदर्शन होईल त्या व्यक्तीने जवळच्या न्यायालयात जाऊन ही माहिती द्यावी. सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये 5 जून पासून रमजान सुरु झाला होता. इस्लाममध्ये लुनार कॅलेंडर (चंद्र दिनदर्शिका) असते. या कॅलेंडर नुसार महिना हा 29 किंवा 30 दिवसांचा असतो. चंद्र दर्शन होताच नव्या महिन्याची सुरुवात होते. भारताचा शेजारी देश पाकिस्तानने 5 जून रोजी जाहीर केले आहे की, देशभरात ईद 5 जूननंतरच साजरी केली जाईल.

रमजान ईद अथवा ईद-उल-फितर फितर मुस्लिम समुदायाचा सर्वात मोठा सण असतो. या काळात पहाटे नमाज अदा केली जाते. या काळात सर्वाधिक लोक हे ईदगाह मध्ये जाऊन नमाज अदा करणे पसंत करतात. या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी, नातेवाईकांचे एकमेकांना भेटणे, मित्र-परिवारासोबत आनंदाची देवाणघेवाण होते. लहान थोर आणि महिला मोठ्या आनंदात असतात.