Dasara | File Image

शारदीय नवरात्रीची (Shardiya Navratri) सांगता विजयादशमी (Vijayadashami) अर्थात दसरा (Dussehra) सण साजरा करून केली जाते. यंदा दसरा 12 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मीयांसाठी दसरा हा मोठा महत्त्वाचा सण आहे. तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. आश्विन शुद्ध दशमी तिथी आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून 'विजयादशमी' साजरी केली जाते मग या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आप्तांना देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी WhatsApp Status, Stickers, Facebook Messages, Wishes, Quotes शेअर करायला विसरू नका.

महाराष्ट्रात दसरा दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटली जातात. आपट्याचं पान एकमेकांना सोनं म्हणून दिलं जातं आणि त्याच्या माध्यमातूनही दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या जातात.  (Dussehra Special Rangoli : दसऱ्याला काढा 'या' सुंदर आकर्षक आणि सोप्या रांगोळी). 

दसर्‍याच्या शुभेच्छा

 

Dasara | File Image
Dasara | File Image
Dasara | File Image
Dasara | File Image
Dasara | File Image

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी अनेक शुभ कामांची सुरूवात केली जाते. या दिवशी सोनं खरेदी, घरं खरेदी केली जाते. वाहनं देखील खरेदीसाठी हा चांगला दिवस म्हणून त्याकडे पाहिलं जातं. दसर्‍याच्या निमित्ताने शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन देखील केलं जातं. घराला तोरण लावून दारात आकर्षक रांगोळी काढून हा सण साजरा केला जातो.