नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्री संपल्या की शेवटी येतो तो दसरा. दसऱ्याला विजयादशमीही म्हणतात. यंदाच्या वर्षी दसरा १८ ऑक्टोबरला आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा येतो. दसरा देशभरात साजरा केला जातो. याच दिवशी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करुन वनवासाहून घरी परतले. तेव्हापासून हा दिवस आनंदाने साजरा केल जातो. दरम्यान, हा दिवस असत्यावर सत्याने मिळवलेला विजय म्हणूनही साजरा केला जातो.
दसरा म्हणजे दहावी तिथी. हिंदू ज्योतिषाचे अभ्यासक सांगतात की, वर्षभरात एकूण ३ मुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. पहिली चैत्र शुक्ल प्रतिपदा, दूसरी कार्तिक शुक्ल प्रतिपदा आणि तिसरा दसरा. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी दसरा हा दिवस महित्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुरु केलेले काम तडीस जाते अशी लोकभावना चालत आली आहे.
दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी रावणवध केला जातो. नऊ दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवाची दसऱ्याला सांगता होते. राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी रावनधहनाच्या कार्यक्रमास मोठी गर्दी होते.