Ambedkar Jayanti Quotes in Marathi: स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दलितांचे कैवारी अशी अनेक बिरुदे मिरवणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती (Dr Babasaheb Ambedkar Birth Anniversary). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते. दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात बाबासाहेबांची जयंती म्हणजेच भीम जयंती (Bhim Jayanti) साजरी केली जाते. हा एक सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा उत्सव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी 14 एप्रिल 1928 रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक असलेल्या बाबासाहेबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.
तर अशा या महामानवाच्या जयंतीनिमित्त खास Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes च्या माध्यमातून त्यांचेच काही प्रेरणादायी विचार शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, 1907 मध्ये भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांच्या सत्कारावेळी त्यांना केळूसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र हे पुस्तक दिले व तेव्हापासूनच बुद्धांची ओळख भीमरावाला झाली. पुढे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मार्च 1959 च्या एका अहवालानुसार देशात दीड ते दोन कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. (हेही वाचा: राज्यभरात दहा दिवस साजरी होणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती; जाणून घ्या कार्यक्रम)
बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील 100 पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.