Dr. APJ Abdul Kalam Death Anniversary (Photo Credits: PTI

Dr.A.P.J. Abdul Kalam  Death Anniversary 2020:  कुशाग्र बुद्धिमत्ता, चांगली विचारसरणी, व्यक्तिमत्वाला शोभेल अशी जगण्याची पद्धत यांसारख्या कैक गुणांनी परिपूर्ण असलेले भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम (Dr.A.P.J. Abdul Kalam) यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. एका गरीब घरातून आलेल्या मच्छिमा-याचा मुलगा जेव्हा एखादा देश चालवतो, तेव्हा तो प्रवास किती खडतर असेल हे शब्दात व्यक्त करणेही कठीण आहे. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील असेच आहेत.

अब्दुल कलामांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला. लहानपणापासूनच ते खूप हुशार, मेहनती आणि कष्टाळू होते. कलामांना सुरुवातीपासून वैमानिक बनण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांची भारतीय वायु सेनेमध्ये निवडही झाली होती. मात्र त्यात ते 9व्या स्थानावर होते. आणि भारतीय वायुसेनेमध्ये पहिल्या 8 उमेदवारांचीच निवड होणे असा नियम होता. याचा अर्थ अगदी थोडक्यासाठी ते वैमानिक होता होता राहिले. कलाम 1969 मध्ये ISRO येथे गेले आणि SLV चा प्रोजेक्ट डायरेक्टर बनले. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली पृथ्वीच्या कक्षेत रोहिणी उपग्रहाचे यशस्वी उड्डाण झाले होते. त्यामुळे पुढे त्यांना 'मिसाईल मॅन' म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्या भाषणातून, व्याख्यानांमधून घेता येणारा 10 प्रेरणादायी विचार!

1. स्वप्न ती नाहीत जी रात्री झोपल्यावर येतात, स्वप्न ती आहेत जी रात्रभर झोपू देत नाही.

2. पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.

3. काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उज्ज्वल करत असतो.

4. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. Dr.APJ Abdul Kalam Death Anniversary: भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहित नसलेल्या 5 आश्चर्यकारक गोष्टी

5. तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

6. यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

7. यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

8. यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

9. जेंव्हा तुमची सही ऑटोग्राफ बनते तेव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा.

10. देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

27 जुलै 2015 रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज भलेही ते आपल्यामध्ये नसतील पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण नेहमीच आपल्याल प्रेरणा देणारी विशेषत: युवा पिढीला स्फूर्तिदायक ठरतील. अशा हरहुन्नरी नेत्याला लेटेस्टलीकडून कोटी कोटी प्रणाम!