Dhanteras 2019: दिव्यांचा सण अशी ओळख असणाऱ्या दिवाळीला येत्या 25 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हिंदू कालदर्शिकेनुसार, आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी (Dhanteras) असते. धनाची देवता लक्ष्मी आणि धनाचे भांडार कुबेर यांची पूजा करण्याचा हा खास दिवस असतो. यादिवशी लोक कुबेराची पूजा करतात. तसेच सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करतात. चला तर मग यंदा धनतेरसचा मुहूर्त तसेच सोनं खरेदीचा मुहूर्त जाणून घेऊयात. (Diwali 2019 Calendar: धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीज पहा यंदा दिवाळी मध्ये कोणता सण कधी?)
धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग या देवतांची यथासांग पूजा केली जाते. आपल्या आयुष्यात आर्थिक तुटवडा येऊ नये, कुबेराची सदैव कृपा राहावी अशी प्रार्थना यावेळी केली जाते. म्हणून यादिवशी नवीन वस्त्रे आणि अलंकार खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. घरातील सोने, चांदी, पैसा पुजून त्यांचे घरातील स्थान अबाधित राहावे या इच्छेने धनाची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी पूजेचे शुभ मुहूर्त -
शुभ मुहूर्त – संध्याकाळी 7.08 ते रात्री 8.14 पर्यंत
प्रदोष काल - संध्याकाळी 5.39 ते रात्री 8.14 पर्यंत
दिवाळी आधी दोन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. याच निमित्ताने आपणही सोन्याचे दागिने, चांदीचे नाणी, भांडी इत्यादींची खरेदी करू इच्छित असाल तर तत्पूर्वी या वस्तूंच्या खरेदीचा यंदाचा शुभ मुहूर्त जाणून घेणं गरजेच आहे.
हेही वाचा - Diwali 2018 : धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !
सोने खरेदीचा मुहूर्त -
वास्तविक धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस हा सोने खरेदीच्या दृष्टीने शुभ मानला जातो. मात्र, त्यातही जर का मुहूर्त पाहायचा असेल तर 25 ऑक्टोबर व 26 ऑक्टोबर रोजी ग्रहांची स्थिती आणि सोने खरेदीसाठी अनुकूल परिस्थिती आहे.
25 ऑक्टोबर: संध्याकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी प्रारंभ
26 ऑक्टोबर: दुपारी 3 वाजून 46 मिनिटांनी समाप्ती
धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशी अशी ओळख असणाऱ्या या सणाच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच लक्ष्मीसोबतच धनाचे भांडार असलेल्या कुबेराची पूजा करण्याला देखील खास महत्व आहे. यादिवशी प्रत्येकजण आपल्या परिस्थितीप्रमाणे सोन्या, चांदीच्या वस्तूंची खरेदी करतो. या धनाचे पूजन करून घरावर अशाच प्रकारे लक्ष्मीची कृपा राहावी अशी प्रार्थना केली जाते. या शुभ मुहूर्तावर धनाची देवता लक्ष्मीदेखील आपल्या भक्तांना अखंड समृद्धीचे वरदान देत असल्याची समज आहे.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिलेला आहे, अंधश्रद्धा पसरवणे हा यामागील उद्देश नसून लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही)