Dhanteras Easy Rangoli Designs:  धनत्रयोदशीच्या दिवशी काढा या सोप्या कलश रांगोळी ( Watch Video )
Photo Credit : YouTube

हिंदू धर्मामध्ये संपूर्ण वर्षात सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2020). तब्बल 5 दिवस हा सण साजरा केला जातो. या पाच दिवसांमध्ये धनत्रयोदशीला  (Dhanatrayodashi) विशेष महत्व आहे. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी साजरी केली जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो.  (Diwali Utane Making At Home : यंदाच्या दिवाळीत घरच्या घरी तयार करा 'सुगंधी उटणे' ; जाणून घ्या सोपी पद्धत ( Watch Video )

यंदा शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे.धनत्रयोदशी दिवशी यमदीपदान केले जाते. अकाली मृत्यूपासून स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण व्हावे तसंच दीर्घायुष्य लाभावे यासाठी यमाची प्रार्थना करुन दीपदान केले जाते. तसेच दारापुढे दिप लाऊन सुंदर रांगोळी ही काढली जाते.आज पाहूयात धनत्रयोदशीला  काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिजाईन.

धनत्रयोदशी स्पेशल पोस्टर रांगोळी

धनत्रयोदशी कलश रांगोळी

चमचा आणि काडीचा वापर करुन काढलेली रांगोळी

धनत्रयोदशी स्पेशल आकर्षक रांगोळी

तेव्हा उद्या म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी खुप सोप्या जास्त वेळ जाणार नाही अशा या रांगोळी डिझाईन नक्की आपल्या दारासमोर काढा आणि दाराची शोभा वाढवा.