Happy Dhanteras 2020 Images: धनत्रयोदशी निमित्त HD Photos, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!
Dhanteras (File Photo)

Happy Dhanteras 2020 Photos: दिवाळीला (Diwali 2020) यावर्षी 12 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी (Dhanteras) साजरी केली जाते. दरवर्षी कार्तिक मासच्या कृष्ण पक्षाला जी त्रयोदशी येते त्याला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. हिंदुसाठी हा शुभ दिवस मानला जातो. तसेच अनेकजण या दिवशी नव्या वस्तूंची खरेदी करतात. यावर्षी धनत्रयोदशी 13 नोव्हेंबरला आली आहे. परंतु, यंदा सर्वत्र कोरोनाचे संकट वावरत आहे. यामुळे नेहमीप्रमाणे हा सण साजरा करता येणार नाही. मात्र, ऑनलाईनच्या माध्यमातून आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊ शकता.

दरम्यान, कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षांच्या त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथन दरम्यान त्यांच्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी वैद्यकीय विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतल्याचे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही, अशी अनेकांची श्रद्धा आहे. हे देखील वाचा- Dhanteras 2020 Gift Ideas : धनत्रयोदशी च्या दिवशी दया 'हे' गिफ्ट्स जे लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सगळ्यांना देऊ शकाल 

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा-

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा-

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा-

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा-

दिवाळीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. तसेच फटके देखील न फोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साधेपणाने साजरा करावी लागणार आहे.