Photo Credit : Pixabay

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali) सण आला आहे.प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने  दिवाळी साजरे करतात.दिवाळी म्हटले की; रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.दरवर्षी दिवाळीच्या रात्रीत जगमगते दिवे, रोषणाईसह फटाक्यांमुळे या सणाला चारचांद लागले जातात. तसेच घराला सजावटीसह फराळ बनवला जातो. (Dhanteras 2020  Rangoli Designs : धनत्रयोदशी दिवशी काढा या सोप्या आणि कमी वेळात काढता येतील अशा सुंदर रांगोळी)

दिवाळी म्हटल की आणखीन एक गोष्ट दिवाळीत केली जाते ती म्हणजे एकमेकांना गिफ्ट्स( GIft) देणे. दिवाळीत लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही ना काही गिफ्ट देण्याची पद्धत असते.त्यामुळे प्रत्येक वेळी काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतो.आजच्या लेखात तुम्हाला याच प्रश्नांच उत्तर मिळणार आहे. पाहूयात धनत्रयोदशी च्या दिवशी काय गिफ्ट्स देता येतील याच्या आयडिया.

मास्क

सध्या आपण प्रत्येक जण कोरोनाशी लढत आहोत त्यामुळे अशा दिवसात सर्वात उपयोगी आणि सगळ्यांनाच देता असे गिफ्ट म्हणते मास्क.तुम्ही वेगवेगळ्या कलर आणि डिजाईन चे मास्क दिवाळी गिफ्ट म्हणून देऊ शकता.

 

View this post on Instagram

 

#facemask #cottonmask #handwork #colorfullmask

A post shared by skp-enterprise (@shree_krishnapriya_lace) on

ऑक्सडाइज ज्वेलरी

महिलांसाठी खास ऑक्सडाइज ज्वेलरी सध्या ऑक्सडाइज ज्वेलरी फॅशन मध्ये आहे.तेव्हा जर तुम्हाला महिलांसाठी काही घ्यायचे असेल तर तुम्ही या पर्यायाचा नक्की विचार करू शकता.

चॉकलेट्स 

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट्स आवडतात त्यामुळे तुम्हाला गिफ्ट घेण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही है पर्याय निवडू  शकता.

ड्रायफ्रूट्स 

जर तुम्हाला वयस्क माणसांना गिफ्ट द्यायचे आहे त्यामुळे त्यांना गोड गोष्टी द्यायच्या नसतील तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स भेट म्हणून देऊ शकता.

तेव्हा यंदाच्या दिवाळीमध्ये आपल्या माणसांना गिफ्ट देण्यासाठी या मधले पर्याय नक्की निवडा.