Dhanteras Rangoli (Photo Credits: Youtube)

Dhanteras Special Rangoli Designs: दिव्यांची रोषणाई, झगमगता कंदील , चटपटीत फराळ आणि रंगबेरंगी रांगोळीचा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2019). आज 25 ऑक्टोबर पासून देशभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे. एकूणच सणाच्या दिवसात घराची सजावट आणि उत्साहामुळे सकारात्मक लहरींचा प्रभाव दिसून येतो. या वातावरणाला चार चांद लावण्यासाठी घरोघरी रांगोळी (Rangoli) काढण्याची पद्धत प्रचलित आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे औचित्य साधून वेगवेगळ्या रांगोळ्या काढली जाते. उदाहरणार्थ, लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Pujan) दिवशी, लक्ष्मीची प्रतिमा, नरक चतुर्दशीला (Narak Chaturdashi)  ठिपक्याच्या रांगोळीत दिवा, तर धनत्रयोदशीला (Dhanteras) कलश काढण्यास पसंती दर्शवली जाते. यंदाच्या वेळापत्रकानुसार, आज धनत्रयोदशी आणि वसुबारस हे योग एकत्र जुळून आले आहेत त्यामुळे हा दिवस तिथिनुसार शुभ आणि फायद्याचा असेल. या दिवसाला आणखीन खास बनवण्यासाठी धनत्रयोदशी विशेष या काही रांगोळ्यांनी तुम्ही आपल्या घराकची शोभा वाढवू शकता.

रांगोळीचे प्रकार आठवतात डोळ्यासमोर येणाऱ्या संस्कार भारती, ठिपक्यांची रांगोळी आणि फुलं पानाची डिझाईन या सर्व स्वरूपातील नमुने एकत्रित रित्या आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, चला तर पाहुयात या धनत्रयोदशी विशेष रांगोळी डिझाइन्स..

संस्कार भारती

Dhanteras 2019 Puja Vidhi: धनत्रयोदशी दिवशी कुबेर आणि धन्वंतरी पूजन करण्याचे महत्त्व, पुजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

ठिपक्यांची रांगोळी

फुलं पानाची डिझाईन

BONUS

वसूबारस ते भाऊबीज या दिवाळीच्या 5-6 दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाच्या महत्त्वानुसार वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्याची प्रथा आहे. यंदा दिवाळी 25 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. मग पहा या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही काय धम्माल-मस्ती करणार? हे आम्हांला नक्की सांगा