Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din)  हा बौद्ध बांधवांचा प्रसिद्ध व प्रमुख सण आहे. हा एक धर्मांतरण सोहळा असून 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी  आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हा पासून हा दिवस दरवर्षी 'अशोक दशमी' म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा स्वरूपात साजरा केला जातो, तसेच तारखेनुसार हा सोहळा 14 ऑक्टोबर रोजी देखील साजरा करण्याची पद्धत आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास पाहिल्यास, इसवी सन पूर्व 3 ऱ्या शतकात सम्राट अशोकाने सुद्धा विजयादशमीच्या मुहूर्तावर बौद्ध धर्म स्वीकारला होता मात्र यांनतर 20 व्या दशकात बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध दीक्षा घेतली, या दोन्ही प्रसंगांमुळे धम्मप्रसाराला एक नवी दिशा मिळाली.दरवर्षी बौद्ध अनुयायी श्रद्धेने हा दिवस साजरा करतात, त्यांच्या आनंदात भर पाडून हा दिवस आणखीन खास करण्यासाठी ही काही मराठी शुभेच्छापत्रे Greetings, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या कुटुंब, मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा..

बुद्धं शरणं गच्छामि

धम्मं शरणं गच्छामि

संघं शरणं गच्छामि

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य

परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे घेऊन धैर्य

एकमुखाने गात भीमरायाचे शौर्य

सोबतीने पार पाडू धम्मप्रसार कार्य

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

गौतमाचा प्रकाश घेऊन अंतरी

पसरवूया अशोकचक्र साऱ्या जगावरी

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

बुद्धाच्या चरणावरती

विजया दशमी दिनी

दिक्षा आम्हा दिली भीमाने

मंगल दिन तो जनी

आपणा सर्वांना या खास दिनाच्या मंगलमय शुभेच्छा

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

धर्म आणि धम्मातले अंतर समजावणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना

धम्मचक्र प्रवर्तन दिनी विनम्र अभिवादन आणि

आपणा सर्वांना या दिनाच्या मंगलमय शुभेच्छा

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

धम्मचक्र प्रवर्तन दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध भिक्षु व अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात, नागपूर येथे मुख्य दीक्षाभूमी असून याठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तर मुंबईत शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी असते.