Dhamma Chakra Pravartan Din 2022 Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त Wishes, Images, SMS, WhatsApp Status शेअर करून बौद्ध बांधवांना द्या खास शुभेच्छा!
धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी बौद्ध बांधव नागपूर येथील दीक्षाभूमीमध्ये एकत्र जमतात. येथे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांच्या स्मृतीला अभिवंदन करतात. या दिवशी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील बौद्ध अनुयायी नागपूरला येतात
उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबरला बौद्ध बांधवांसाठी खास असलेला धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Day 2022) साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी काही बौद्ध बांधव तारखेप्रमाणे तसेच तिथीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात. त्यानुसार, 14 ऑक्टोबर रोजी तारखेनुसार धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. तर 25 ऑक्टोबर रोजी तिथीप्रमाणे धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची प्रथा आहे. धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी बौद्ध बांधव नागपूर येथील दीक्षाभूमीमध्ये एकत्र जमतात. येथे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांच्या स्मृतीला अभिवंदन करतात. या दिवशी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील बौद्ध अनुयायी नागपूरला येतात. गेली दोन वर्ष मात्र देशावर कोरोना विषाणूचे सावट होते. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या अटीनुसार बौद्ध अनुयायांना धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करावा लागत होता. पंरतु आता कोणतेही विषाणूचे सावट नसुन किंवा कोणत्याही सरकारच्या अटी नुसार यावर्षी बौद्ध अनुयायांना धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येईल.
धम्म चक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यामागे मोठा इतिहास आहे. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त Messages, Images, SMS, WhatsApp Status शेअर करून बौद्ध बांधवांना खास मराठी शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील संदेश नक्की उपयोगात येतील. (हे देखील वाचा: Dussehra 2022 Rangoli Designs: दसरा दिवशी 'या' आकर्षक रांगोळ्यांनी साजरा करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस)





दरम्यान, इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती. त्यामुळे आंबेडकरांनीदेखील अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले. डॉ आंबेडकरांनी 14 आक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या 5,00,000 अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. तेव्हापासून आतापर्यंत बौद्ध अनुयायी हा दिवस धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात.
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2022 10:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

