भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस (Samvidhan Diwas) म्हणून साजरा केला जातो. भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 दिवशी स्वीकारण्यात आले होते तर 26 जानेवारी 1950 दिवशी ते अंमलात आणले होते. त्यामुळे भारतीयांसाठी 26 नोव्हेंबर हा दिवस खास आहे. 2015 पासून 26 नोव्हेंबर दिवशी संविधान दिवस साजरा करण्याला सुरूवात झाली आहे. हा दिवस नॅशनल लॉ डे (National Law Day) म्हणून देखील ओळखला जातो. मग आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेत लोकशाहीला बळकटी देणार्या संविधानाला चिरायू ठेवण्यासाठी तुमच्या प्रियजणांना सोशल मीडीयाच्या माध्यमातून भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्च्छा सोशल मीडीयामध्ये मराठी इंग्रजी ग्रीटिंग्स, Wishes, Quotes, Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करण्यासाठी आज खालील शुभेच्छापत्रांना डाऊनलोड करून नक्कीच Facebook, Twitter, Instagram वर शेअर करू शकता.
26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस हा भारतीय नागरिकांसाठीअत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशातील ब्रिटीशांची सत्ता संपूनन जगाच्या पटलावर नव्या राष्ट्राचा उदय करण्यामागे हा दिवस महत्त्वाचा आहे. भारतीय संविधान बनवण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणीसाठी एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. भारत 1947 मध्ये ब्रिटीश सत्तेतून स्वतंत्र झाला खरा पण भारतीय राज्यघटना स्थापन करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला. भारतीय संविधाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जरी नसली तरी सरकारी कार्यालयांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 ला भारतात लागू झाले संविधान; संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
संविधान दिनाच्या शुभेच्छा
संविधान हे प्रत्येक देशाच्या बांधणीचा पाया असून देशातील नागरिकांना दिलेले अधिकार आणि त्यांची कर्तव्यं यात नमूद केलेली असतात. संविधान दिनानिमित्त संविधानाविषयी अधिक ज्ञान मिळवून लोकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याविषयी अधिक जागृत करणे म्हणजे संविधान दिवसाचे खरेखुरे सेलिब्रेशन होय.