Shiv Jayanti Tithi Date 2021: महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा (Shiv Jayanti) सोहळा हा शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. पण तिथी नुसार देखील 2 विविध तिथींना शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा साजरा करतात. त्यापैकी एक म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया (Falgun Vadya Tritiya) .यंदा ही फाल्गुन वद्य तृतीया 31 मार्च 2021 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त तिथीनुसार यंदा 31 मार्च दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. Shiv Jayanti Tithi 2021 Wishes in Marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा!
महाराष्ट्रात शिवजयंती आणि तारखेचा वाद खूप जुना आहे. दरम्यान फाल्गुन वद्य तृतीया सोबतच वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी देखील काहीजण शिवजयंती साजरी करतात. महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्यामुळे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी शिवनेरी गडावर शिवजयंती सोहळा साजरा करतात. महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील साजरी करण्यात आली आहे. यावर्षी देखील 19 फेब्रुवारीला मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरी वर कोरोना संकटाच्या सावटाखाली शिवजयंतीचा सोहळा पार पडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021 तिथी वेळ
फाल्गुन वद्य तृतीया तिथेचे सुरूवात - 30 मार्च सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटं
फाल्गुन वद्य तृतीया तिथीची समाप्ती- 31 मार्च दुपारी 2 वाजून 6 मिनिटं
एरवी शिवजयंतीचं औचित्य साधत शिवभक्त शिवरायांच्या विविध गडांना भेट देऊन तेथे साफसफाईचं काम करतात. पोवाडे, शिवजन्माचा पाळणा गाऊन शिवजयंतीचा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे.
महाराष्ट्रात 1869 साली रायगडावरील शिवरायांच्या समाधींचा शोध लागल्यानंतर पुढील वर्षापासून ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्वातंत्र्यचळवळीमध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांनी शिव जयंती साजरी केली आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शिवजयंती साजरी केल्याचे इतिहासात दाखले आहेत.