Chandra Shekhar Azad | (File photo)

Chandra Shekhar Azad Jayanti 2021 Quotes: भारताचे महान क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी चंद्र शेखर आजाद यांची आज 115 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यांचा जन्म 23 जुलै 1906 मध्ये मध्य प्रदेशातील झाबुआ येथील भाबपरा गावात एका सनातन धर्मातील ब्राम्हण परिवारात झाला होता. त्यांचे वडील सीताराम तिवारी जे एक प्रसिद्ध पंडित आणि त्यांची आई जगरानी देवी या गृहिणी होत्या. आजाद यांना त्यांच्या बालपणी चंद्र शेखर सीताराम तिवारी या नावाने संबोधले जात होते. मात्र त्यांनी नंतर आपल्या नावात आजाद जोडले. भारताचे वीर सुपुत्र चंद्र शेखर आजाद यांच्या मनात बालपणापासूनच मनात ब्रिटिश सरकारची रणनिती आणि त्यांच्या क्रुरतेच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता.

आजाद यांनी 1921 मध्ये इंग्रजांच्या विरोधात असहयोग आंदोलनात भाग घेतला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 15 वर्ष होते. आजादीच्या मार्गावर चालणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानींनी ठरविले होते की, ते जीवंत कधीच पोलिसांच्या हाती लागणार नाही. चंद्रशेखर आजाद यांची वीरगाथा अजूनही अंगावर काटा उभा करते. तर त्यांच्या आजच्या 115 व्या जयंती निमित्त त्यांचे काही विचार एकमेकांना शेअर करुन देशावरील प्रेमाची भावना व्यक्त करण्यास जरुर भाग पाडतील.(Guru Purnima 2021 Messages in Marathi: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी Quotes, Wishes, WhtsApp Status द्वारा शेअर करून गुरूंना करा वंदन!)

1- मेरा नाम आजाद है, मेरे पिता का नाम स्वतंत्रता और मेरा घर जेल है.

2- दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं और आजाद ही रहेंगे.

3- मैं ऐसे धर्म को मानता हूं, जो स्वतंत्रता, समानता और भाईचारा सिखाता है.

4- यदि कोई युवा मातृभूमि की सेवा नहीं करता है तो उसका जीवन व्यर्थ है.

5- अगर आपके लहू में रोष नहीं है तो ये पानी है, जो आपकी रगों में बह रहा है. ऐसी जवानी का क्या मतलब जो मातृभूमि के काम ना आए.

6- चिंगारी आजादी की सुलगती मेरे जिस्‍म में है. इंकलाब की ज्वालाएं लिपटी मेरे बदन में हैं. मौत जहां जन्नत हो यह बात मेरे वतन में है. कुर्बानी का जज्बा जिंदा मेरे कफन में है.

आजाद हे नेहमी आपल्या सोबत एक पिस्तुल ठेवत असत. त्याचे नाव त्यांनी बमतुल बुखारा असे ठेवले होते. आपल्या मातृभुमिसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास नेहमीच तयार असणाऱ्या आजाद यांना त्यांचा कोणताच फोटो इंग्रजांच्या हाती लागू द्यायचा नव्हता. यासाठी त्यांनी स्वत:चे सर्व फोटो नष्ट केले. मात्र त्यांचा अखेरचा फोटो झासी येथे राहिला होता. इंग्रजांच्या हुकूमाच्या विरोधात लढा देणारे आजाद 27 फेब्रुवारी  1931 मध्ये इलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्कात शहीद झाले.