
हिंदू धर्मीय शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्र (Chaitra Navratri) देखील मोठ्या उत्साहात साजरी करतात. चैत्र हा हिंदू कॅलेंडर मधील पहिला महिना आहे. गुढीपाडवा हा सण जसा मोठ्या उत्साहात घराघरात साजरा केला जातो तसाच चैत्र नवरात्रीचा देखील उत्साह असतो. घटस्थापना करून शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री या दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना करण्याची पद्धत आहे. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना (Ghatasthapana) केली जाते.महाराष्ट्रामध्ये या नवरात्रीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम होतो.
चैत्र नवरात्री घटस्थापना मुहूर्त
30 मार्च दिवशी घटस्थापना केली जाणार आहे. या दिवशी त्यासाठी सकाळी 6.13 पासून 10.22 पर्यंतचा मुहूर्त आहे. तर अभिजात मुहूर्त हा दुपारी 12.01 ते 12.50 पर्यंतचा आहे. यंदा चैत्र मासारंभ 30 मार्चला आहे. मात्र पर्तिपदा तिथी 29 मार्चला संध्याकाळी 4 वाजून 27 मिनिटांनी सुरू होत आहे आणि 30 मार्चला 12 वाजून 49 मिनिटांनी संपणार आहे. नक्की वाचा: Chaitra Navratri Special Rangoli: चैत्र नवरात्री निमित्त दाराबाहेर 'या' मनमोहक रांगोळ्या काढून देवीच्या आगमनाची करा जय्यत तयारी .
चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस
चैत्र नवरात्री 30 मार्चपासून सुरू होत आहे. शारदीय नवरात्री प्रमाणे ही नवरात्र देखील दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे.
पहिला दिवस - 30 मार्च मां शैलपुत्री पूजा
दुसरा दिवस- 31 मार्च मां ब्रह्मचारिणी पूजा
तिसरा दिवस- 01 एप्रिल मां चंद्रघंटा पूजा
चौथा दिवस- 02 एप्रिल मां कूष्मांडा पूजा
पाचवा दिवस- 03 एप्रिल मां स्कंदमाता पूजा
सहावा दिवस- 04 एप्रिल मां कात्यायनी पूजा
सातवा दिवस- 05 एप्रिल मां कालरात्रि पूजा
आठवां दिवस- 06 एप्रिल मां गौरी आणि मां सिद्धिदात्री पूजा
महाराष्ट्रात नवरात्री निमित्त हळदीकुंकू
महाराष्ट्रात चैत्र महिन्यात सवाष्ण महिला घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आंबेडाळ आणि कैरीच्या पन्हाचा बेत केला जातो. अष्टमी-नवमी यंदा 6 एप्रिललाच असल्याने या दिवशी कन्या पूजन देखील केले जाते.