Chaitra Navratri Rangoli (Photo Credits: Youtube)

Chaitra Navratri Rangoli Designs: चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस असणा-या चैत्र नवरात्रीला वासंती नवरात्र असेही म्हणतात. या दिवसापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते. महाराष्ट्रात या चैत्र नवरात्रीमध्ये हळदी-कुंकू आयोजित केले. घरोघरी चैत्रगौरीची पूजा केली जाते. चैत्र शुद्ध नवमीपर्यंत सुरु असणारा हा नवरात्रीचा सण आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नवरात्रीत भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. देवीची मनोभावे पूजा-अर्चा करतात. या दिवसांत देवीचा आपल्या घरात वावर असावा यासाठी तिच्या आगमनाची जय्यत तयारी करतात.

यासाठी दारात रांगोळी देखील काढली जाते. घरात मंगलमय आणि प्रसन्न वातावरण राहावे यासाठी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. या चैत्र नवरात्री निमित्त पाहूया कोणत्या सुंदर रांगोळ्या काढता येतील ते :

हेदेखील वाचा- Chaitra Navratri 2020 Messages: चैत्र नवरात्री च्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Wishes, WhatsApp Status, Images च्या माध्यमातून देऊन भक्तिमय वातावरणात साजरा करा हा नऊ दिवसांचा उत्सव

हेही वाचा- Chaitra Navratri 2020: चैत्र नवरात्री च्या दिवसांत नऊ देवींना कोणता नैवेद्य अर्पण करावा, जाणून घ्या सविस्तर

हिंदू भाविक नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी मां शैलपुत्री, दुसर्‍या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्रि, आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्रि देवीच्या रूपाची आराधना केली जाते. ही सर्व दुर्गा मातेची रुपं असून या प्रत्येक रुपातील देवीला विशेष पद्धतीचा नैवेद्य अर्पण केला जातो.