Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi (फोटो सौजन्य - File Image)

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Messages: दरवर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti 2025) साजरी केली जाते. आंबेडकर जयंतीचा मुख्य उद्देश समाजात समता, बंधुता आणि न्यायाच्या कल्पनांचा प्रसार करणे आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकरांनी दिलेले योगदान भारताला आधुनिक, लोकशाहीवादी आणि समतावादी राष्ट्र बनवण्याचा पाया होता. महिला, मागासवर्गीय आणि दलित समुदायाच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक महत्त्वाची पावले उचलली. बाबासाहेबांनी दिलेला 'शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा', हा संदेश आजही लोकांना प्रेरणा देतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही सोशल मीडियाद्वारे आंबेडकर जयंती WhatsApp स्टेटस, आंबेडकर जयंती फेसबुक ग्रीटिंग्ज, आंबेडकर जयंती कोट्स, आंबेडकर जयंती मेसेज द्वारे तुमच्या मित्र-परिवारास महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Ambedkar Jayanti Rangoli Designs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरासमोर, शाळेच्या प्रागंणात काढा या सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video))

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा

वेग होता…

अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा

इरादा नेक होता….!

असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर

लाखात नाहीतर तर जगात एक होता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची

तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची

तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हते

तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे

खरे महामानव होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

दगड झालोतर दिक्षाभूमीचा होईल,

माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,

हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,

पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,

आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला

तर आई शपथ ,फक्त आणि फक्त

जय भीमवालाच होईल..

जयंतीनिमित्त महामानवाला मानाचा मुजरा!

Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,

कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,

भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जय भीम

Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi 4(फोटो सौजन्य - File Image)

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती

तुम्ही येणार म्हटल्यान

नसानसांत भरली स्फूर्ती

आतुरता फक्त आगमनाची

जयंती माझ्या बाबांची.

Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi 5(फोटो सौजन्य - File Image)

हिंदू धर्मातील वाईट प्रथा आणि अस्पृश्यतेला कंटाळून बाबासाहेबांनी 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न, भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले, म्हणून दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो.