
Happy Bhaubeej 2024 Messages In Marathi: भाईबीज (Bhaubeej 2024) हा सण अत्यंत शुभ दिवस असून हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना मोठ्या प्रेमाने टिळक लावतात आणि औक्षण करून त्यांना एक धागा बांधतात. त्या बदल्यात भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. याशिवाय, बहिण या दिवशी आपल्या भावाच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो, ज्याला यम द्वितीया किंवा भ्रात्री द्वितीया असेही म्हटले जाते.
यावर्षी 3 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण साजरा करण्यात येणार आहे. 03 नोव्हेंबर 2024 रोजी भावाचे औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त दुपारी 01:10 ते 03:22 पर्यंत आहे. या काळात बहिणी आपल्या भावाचे औक्षण करून त्याला पवित्र धागा बांधू शकते. भाऊबीजेचा दिवस हा भाऊ-बहिणींच्या नात्यातील बंध आणखी जास्त अतूट करतो. या दिवशी भाऊ-बहिणी एकमेकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील हॅप्पी भाऊ बीज मेसेजेस, हॅपी भाऊ बीज कोट्स, हॅपी भाऊ बीज वॉलपेपर, हॅपी भाऊ बीज शुभेच्छा, भाऊबीज मराठी शुभेच्छा संदेश पाठवून हा सण आणखी खास करू शकता.
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात,
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

जिव्हाळ्याचे संबंध
दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!

ना सोनं, ना चांदी,
ना हत्ती ना पालखी,
फक्त मला भेटायला ये दादा.
प्रेमाने बनवलेलं जेवण जेवूया,
भाऊबीज साजरी करूया.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

आनंदाचे सनई-चौघडे वाजले अंगणात,
सदैव दीप उजळो
माझ्या भावाच्या जीवनात
हॅपी भाऊबीज!

मनात आहे हीच इच्छा,
प्रेमाने राहो आपल्यातील बंधुभाव दादा.
छोट्या बहिणीकडून तुला
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

भाऊबीज हा सण हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा दिवस भाऊ आणि बहिणींमधील आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक उत्तम प्रसंग आहे. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व देखील आहे. पौराणिक मान्यतानुसार, भाऊबीजेच्या दिवशी नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्ण द्वारका शहरात परतले. यावेळी भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिने त्यांचे फुले, मिठाई आणि अनेक दिवे लावून स्वागत केले होते. या दिवशी देवी सुभद्राने भगवान श्रीकृष्णाच्या दीर्घायुष्याची कामना केली होती. तेव्हापासून भाईबीज हा सण साजरा केला जाऊ लागला.