Saraswati Pujan 2024 Messages (PC- File Image)

Saraswati Pujan 2024 Messages In Marathi: वसंत पंचमी (Vasnat Panchami 2024) च्या दिवशी विद्येची देवता सरस्वती (Saraswati) चा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी या मुहूर्तावर सरस्वती पूजन (Saraswati Pujan) करण्याची प्रथा आहे. सरस्वती पूजेलाचं वसंत पंचमी म्हणूनही ओळखले जाते. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. जो ज्ञान, संगीत, कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. सरस्वती पूजा माघ महिन्यात साजरी केली जाते. जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला वसंत पंचमी साजरी साजरी करण्यात येते. या दिवशी भक्त ज्ञान आणि संगीताची देवी सरस्वतीची पूजा करतात. यंदा 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी करण्यात येणार असून या दिवशी सरस्वती पूजन करण्यात येणार आहे.

वसंत पंचमीच्या दिवशी लोक बुद्धी आणि ज्ञानासाठी प्रार्थना करतात. या दिवशी लोक सहसा सरस्वतीच्या लहान मूर्ती बनवतात आणि त्यांना फुले, फळे वाहतात. अनेकजण या दिवशी सरस्वती देवीसाठी उपवास करतात आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सरस्वती स्तोत्राचा जप करतात. अनेक शैक्षणिक संस्था या दिवशी विशेष पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. याशिवाय अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून सरस्वती देवीला नमन करतात. तुम्ही देखील वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा देणारे Greetings, HD Images, WhatsApp Status शेअर करून सरस्वतीदेवीचा जन्मोत्सव साजरा करू शकता.

सरस्वती माता तुमच्या जीवनात ज्ञान, किरण,

संगीत, सुख, शांति, धन, संपत्ति, समृद्धि

आणि प्रसन्नता आणेल.

तुम्हा सर्वांना सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Saraswati Pujan 2024 Messages (PC- File Image)

या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा!

Saraswati Pujan 2024 Messages (PC- File Image)

सरस्वतीच्या पूजनाने आपण

ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा

सरस्वती पूजनच्या हार्दिक शुभेच्छा!

Saraswati Pujan 2024 Messages (PC- File Image)

सर्व शिक्षणाचे दिवे लावू,

निरक्षरांना शिक्षित करूया,

समतेचे समर्थन करूया,

झोपलेल्यांना जागे करूया.

सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Saraswati Pujan 2024 Messages (PC- File Image)

हे सरस्वती पूजन तुमच्या घरात

व आयुष्यात सुख संपत्ति आणि ज्ञानाचा

वर्शाव करेल अशी आमची तुम्हास व

तुमच्या परिवारास अनेक शुभेच्छा!

Saraswati Pujan 2024 Messages (PC- File Image)

माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी सरस्वती पूजा वसंत ऋतूची सुरुवात दर्शवते. भारताच्या पूर्व भागात, विशेषतः बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव सरस्वती पूजा म्हणून ओळखला जातो. वसंत पंचमीच्या चाळीस दिवसानंतर होळीचा सण साजरा केला जातो.