Bhogi 2020: मकरसंक्रांती च्या आदल्या दिवशी का साजरी केली जाते 'भोगी'? जाणून घ्या या दिवसाचे विशेष महत्व
Bhogi (Photo Credits: Instagram)

Bhogi 2020 Importance: थंडीची चाहूल लागली जानेवारी महिन्यात थोडक्यात नववर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रात (Makar Sankranti). या दिवशी एकमेकांना तिळगूळ-लाडू दिले जाते. या सणाच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची विशिष्ट भाजी केली जाते. आपल्यापैकी अनेकांना भोगी म्हणजे या दिवशी महिलांनी केस धुवायचे, भोगीची भाजी बनवायची एवढ्याच गोष्टी माहिती असतील. पण मुळात का व कशासाठी साजरी केली जाते हे अनेकांना माहित देखील नसेल. म्हणूनच आज आम्ही भोगी सणाची माहिती देणार आहोत.

'न नाही भोगी, तो सदा रोगी' हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी तीळ लावलेल्या भाक-या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात. माणसाच्या परस्परसंबंधांमद्ये स्नेह निर्माण व्हावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो.

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2020: 'मकर संक्रांत' नक्की का साजरी करतात; जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व

भोगी का साजरी करतात?

या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेटही देत असे.

हेदेखील वाचा-Bhogi Bhaji Recipes: भोगी च्या भाजीपासून त्याच्या कालवणापर्यंत अशा बनवा या लज्जतदार रेसिपीज, नक्की करुन करा

मकरसंक्रांती च्या आदल्या दिवशी का साजरी केली जाते 'भोगी'? जाणून घ्या या दिवसाचे महत्व Watch Video 

या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. थंडीतील विशेषत: नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फलदायी ठरते. म्हणून न विसरता या दिवशी भोगीच्या दिवशी या भाजीची चव अवश्य चाखा आणि गुलाबी थंडीचा आनंद घ्या.