Bhogichi Bhaji Recipe ( Photo Credits: You tube/ Ruchkar Mejwani )

Bhogi Food Recipes: भारतीय सण म्हटला लज्जतदार, खमंग पदार्थांची जणू मेजवानीच असते. आपल्याकडे असे बरेच सण आहेत जिथे सणांप्रमाणे पदार्थ बनवले जातात किंबहुना ती त्या सणांची ओळख असते. जसे होळीला पुरणाची पोळी, गणेश चतुर्थीला मोदक इत्यादी. असाचा आणखी एक सण म्हणजे भोगी. या दिवशी भोगीची भाजी बनविणे हे सणाचे वैशिष्ट्य मानले जाते. भोगी हा एक भौगोलिक सण असून या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि थंडीचा काळ सुरु होतो. म्हणून या दिवशी पचायला हलक्या अशा मिश्र भाज्या बनवल्या जातात. त्यातीलच ही भोगीची भाजी... ही भाजी खूप पौष्टिक आणि शरीरासाठी गुणकारी आहे.

भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी (Bhogichi Bhaji ) आणि बाजरीची भाकरी (Bajari Bhakri) करण्याची प्रथा आहे.

पाहूयात भोगीची भाजी आणि कालवणाच्या रेसिपीज:

हेदेखील वाचा- Bhogi 2020: मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी का साजरी केली जाते 'भोगी'? जाणून घ्या या दिवसाचे विशेष महत्व

भोगीचे कालवण:

महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला 'खिंगाट' म्हणतात. ही भाजी- भाकरी चविष्ट असते पण त्यासोबतच हिवाळ्याच्या दिवसात त्याची चव चाखण्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे.