Bhagat Singh's Marathi Quotes: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो लोक लढले होते, अनेकांच्या प्राणांची आहुती दिली गेली, कित्येकांचे कुटुंब विखरून गेले. यामध्ये भगतसिंह (Bhagat Singh) यांना झालेली फाशी ही सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. 1931 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना 23 मार्च रोजी फाशी देण्यात आली होती. अवघ्या 23 व्या वर्षी भगतसिंह यांनी भारतमातेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना, कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. ही हत्या 17 डिसेंबर, 1928 रोजी झाली होती.
त्यानंतर याबाबत कोर्टात खटला उभा राहिला व अखेरीस 23 मार्च, 1931 रोजी त्यांना फासावर लटकविण्यात आले. भगतसिंहचा जन्म 1007 साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंह होते. तर आज भगतसिंह यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून, आम्ही घेऊन आलो आहोत त्यांचे काही विचार, जे तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा जवळच्या लोकांना WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून पाठवून जागवू शकता या शहिदाच्या त्यागाच्या आठवणी.
(हेही वाचा: काँग्रेसकडून स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना भारतरत्न देण्याची मागणी)
दरम्यान, भगतसिंह यांचा वाचनव्यासंग दांडगा होता, ते उत्तम वक्ते होते. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. लेखक आणि कवी म्हणूनही त्यांची ओळख होती. भगत सिंह यांचा प्रत्येक विचार देशभावनेचे प्रतिक आहे. आजच्या युवकांना त्यातून प्रेरणा तर मिळतेच. परंतू, बरेच काही शिकायलाही मिळते. तर असा हा आज भगतसिंह यांचा स्मृतिदिन शहीद दिवस (Martyrs' Day) म्हणूनही ओळखला जातो.