काँग्रेसकडून स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना भारतरत्न देण्याची मागणी
Lok Sabha Election 2019: काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपने (BJP) त्यावेळी पक्षाचा जाहीरनामा सादर केला होता. या जाहीरनाम्यात स्वातंत्रवीर सावरकर (Vinayak Savarkar) यांना भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची मागणी करणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन वाद रंगला होता. यात काँग्रेस पक्षाचे नेते (Congress) मनीष तिवारी (Manish Tiwari) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरू (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांना भारतरत्न देण्याचे आवाहन केले आहे. भगतसिंह, राजगुरू, आणि सुखदेव यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले असून येत्या 26 जानेवारी 2020 मध्ये या तिघा शहिदांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर अनेक राजकीय वादांनी पेट घेतला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात वीर सावरकर यांना भारतरत्न मागणी करणार असल्याचा मुद्दा मांडला होता. यानंतर काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनाही भारतरत्न देण्यात यावा हा मुद्दा उपस्थित करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनीष तिवारी यांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना भारतरत्न देण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर चंदीगड विमानतळ भगतसिंग यांच्या स्मृतीनिमित्त समर्पित करण्याची विनंती केली आहे. त्यांनी या तिघा शहिदांना 'शहीद ए आझम' पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. आपल्या पत्रात तिवारी म्हणतात की, भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी 23 मार्च 1931 ला आपले बलिदान दिले. त्यांच्यामुळे एक संपूर्ण पिढी प्रेरित झाली. त्यांना येत्या 26 जानेवारी 2020 मध्ये या तिघा शहिदांना भारतरत्न दिला यावा, असे मनीष तिवारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. हे देखील वाचा- आमचं ठरलंच नव्हतं; पाचही वर्षं मुख्यमंत्री भाजपचाच: देवेंद्र फडणवीस

मनिष तिवारी यांचे ट्विट-

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत घेतली. यात मनमोहन सिंह म्हणाले की, काँग्रेस सावरकर यांच्या विरोधात नाही. केवळ त्यांच्या हिंदुत्व विचारधारेचा विरोध केला जातो असे, त्यांनी म्हटले होते. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांची मागणी पूर्ण होईल का? याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.