Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

पाचही वर्षे मुख्यमंत्री हा भाजपचाच राहील आणि तो मी असेन. तसेच, पाचही वर्षे भाजप (BJP) सरकार राज्यात स्थिर असेन असे वक्तव्य करत मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत कोणताही फॉर्म्यूला ठरला नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) काय प्रतिक्रिया देते याबाबत उत्सुकता आहे.

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना सांगितले की, सामनातून होणारी टीका जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत चर्चा पुढे सरकत नाही. पाचही वर्षं मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावे असे शिवसेनेला वाटू शकते. मात्र, वाटू शकणे आणि तसे होणे यात फरक आहे. परंतू, पाच वर्षे भाजपचेच सरकार असेल आणि ते सरकार स्थिर असेन, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगीतले.

दरम्यान, सध्या भाजपकडे प्लान ए आहे. मात्र, प्लान बी कोणताही नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर शिसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते याबबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, 'आमच्याकडे इतर पर्याय पण आहेत', शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजप ला इशारा)

एएनआय ट्विट

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच भाजपला इशारा दिला होता की, शिवसेनेकडे इतरही पर्याय उपलब्ध आहेत. परंतू, ते पाप आम्हाला करायचे नाही. हरियाणाप्रमाणे इथे कोणी दुष्यंत नाही, आणि त्याचे वडील तुरुंगात नाहीत, असा टोलाही राऊत यांनी लगावला होता. राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर फडणवीस यांनी भाजपची भूमिका व्यक्त केली आहे. आता दोन्ही पक्षातील संघर्ष काय रुप घेतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.