Bhagat Singh Birth Anniversary: भगतसिंह यांच्या 113 व्या जयंती निमित्त त्यांंच्या आयुष्याविषयी फार माहित नसलेल्या गोष्टी जाणुन घ्या
भगत सिंह | (Photo Credits: File Image)

Bhagat Singh 113th Birth Anniversary: स्वतंत्र भारतासाठी हजारोंंनी बलिदान दिले अर्थात त्या सर्वांचे आपण आजही ऋणी आहोत, पण त्यातही भगतसिंह यांंचे नाव विशेष लक्षात राहते कारण वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी ते देशासाठी फाशीवर चढले होते. मोडेन पण वाकणार नाही या उक्तीला समर्पक असे ज्यांंचे काम होते. भगतसिंंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 चा आहे, पाकिस्तान (तत्कालीन हिंंदुस्थान) ल्यालपूर येथे त्यांंचा जन्म झाला होता, भगतसिंंह जहाल मतवादी होते, त्यामुळे सरकारी शिक्षण किंंवा चाकरी करणे त्यांंनी कधीही स्विकारले नाही. उलट वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षापासुन ते विविध आंदोलनात सहभागी होऊ लागले, 1926 मध्ये म्हणजेच 19 व्या वर्षी त्यांंनी नवजवान भारत सभेची स्थापना केली होती, हिंदुस्तान सोशलिस्ट पार्टीचे ते  सदस्य होते. भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती आहे. याच निमित्ताने या थोर देशप्रेमी आणि स्वातंत्र्यसैनिकाविषयी काही खास गोष्टी ज्या की कदाचितच आपल्याला माहित असतील त्या आपण जाणुन घेणार आहोत.

भगतसिंंह यांंच्याविषयी मराठी माहिती

-भगतसिंंह यांंची केवळ देशावर निष्ठा होती, देव धर्म ते मानत नसत. याचा पुरावा म्हणजे त्यांंनी लिहिलेला मी नास्तिक का झालो? हा निबंंध आहे. Bhagat Singh Birth Anniversary: क्रांतिकारक भगत सिंह यांचे 10 प्रेरणादायी विचार

-भगतसिंंह लहानपणापासुन प्रचंंड वाचनप्रेमी होते. लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की, बकुनिन यांंचा त्यांंनी अभ्यास केला होता.

-भगतसिंंह यांंनी स्वतः सुद्धा अनेक पुस्तके लिहिली आहेत, यातील शेवटची चार म्हणजेच ‘द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया’, ‘द आयडियल ऑफ सोशॅलिझम’, ‘ऑटोबायोग्राफी’ आणि ‘अ‍ॅट द डोअर ऑफ डेथ’ ही पुस्तकं त्यांनी तुरुंंगात असताना लिहिली आहेत.

-भगतसिंंह यांंनी देशप्रेमासाठी स्वतःचे सुख सुद्धा बाजुला ठेवले होते, म्हणुनच जेव्हा त्यांंच्या लग्नाविषयी कुटुंंबात चर्चा होऊ लागल्या तेव्हा ते घर सोडून कानपुर ला निघुन आले होते, देशासमोर माझे भौतिक सुख अडथळा बनता कामा नये असे त्यांंचे मत होते.

-1924- 25 च्या कॉंंग्रेस अधिवेशनाच्या नंंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले होते.

- भगतसिंंह यांंनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या. पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली होती.

-भगतसिंंह यांंना दिलेली फाशी ही संंसदेवर बॉम्ब हल्ला केल्याने नव्हे तर सौंडर्सच्या हत्येमुळे झाली होती. त्यांंनी राजगुरु आणि सुखदेव यांंच्यासह 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले.

- लाला लजपतराय यांंच्यावर ब्रिटीश पोलिस अधिकार्‍यांंनी केलेल्या लाठीचार्जमुळे त्यांंचा मृत्यु झाला होता, ज्याचा बदला म्हणुन पोलिस अधिकारी स्कॉट ला मारण्याचा भगतसिंंह यांंनी कट आखला होता मात्र यावेळी साँडर्स ला गोळ्या लागुन त्याचा मृत्यु झाला होता.

- भगतसिंंह यांंची फाशी टळावी यासाठी महात्मा गांंधी यांंनी व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन याची भेट घेतली होती पण या भेटीमुळे पंंजाबच्या गव्हर्नर स्तर्क झाले आणि मुल 24 मार्च हा फाशीचा दिवस ठरला असतानाही एक दिवस आधीच 23 मार्च 1931 रोजी भगतसिंंह यांंना फाशी देण्यात आली.

आयुष्य हे स्वत:च्या हिमतीवर जगायचे असते. दुसऱ्यांच्या खांद्याचा आधार घेऊन तर अंत्ययात्रा जाते असे भगतसिंंह यांंचे विचार होते त्याच विचारांवर आधरित त्यांंचे जीवन दिसुन येते जोवर आपल्याला शक्य झाले तोवर अगदी सक्रिय राहुन त्यांंनी ब्रिटीश राजवट हादरवुन टाकली होती आणि त्यानंंतर जेव्हा मृत्युची वेळ आली तेव्हाही त्यांंनी अगदी हसत हसत देशासाठी बलिदान दिले. आज त्यांंच्या जयंंती निमित्त या थोर क्रांंतिकारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!