Balaji Bajirao Peshwa 400th Birth Anniversary: मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी मोलाची भूमिका बजावणा-या बालाजी बाजीराव पेशवा यांचा अंगावर काटा आणणारा इतिहास
Balaji Bajirao Peshwa (Photo Credits: File Photo)

बालाजी राव ऊर्फ नानासाहेब पेशवा (Balaji Bajirao Peshwa) ही आपले पिता बाजीराव पेशवा (Bajirao Peshwa) इतके आक्रमक योद्धा जरी नसले तरी त्यांच्यासोबत राहून त्यांनी खूप कमी वयात युद्धकलेत पारंगत झाले होते. त्यांनी मराठा शक्तिला घेऊन उत्तरेपासून दक्षिणपर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. असे सांगितले जाते की शिवाजी महाराजांच्या जीवनात जी भूमिका आई जिजाबाईंची होती तिच भूमिका बालाजी राव यांच्या जीवनात त्याचे पित बाजीराव यांची होती. बालाजी राव यांचा इतिहास अंगावर काटा आणणारा असा आहे. त्यामुळे त्यांच्या आज 400 व्या जयंतीनिमित्त (Balaji Bajirao Peshwa 400th Birth Anniversary) त्यांचा हा इतिहास जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असेल.

19 व्या वर्षी बनले होते पेशवा

बालाजी यांचा जन्म 8 डिसेंबर 1720 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव काशीबाई होते. बाजीराव लहानपणापासून बहादूर, धाडसी आणि निडर होते. आपल्या वडिलांच्या निधनानंतर 19 वर्षीय बालाजी राव 4 जुलै 1740 मध्ये पेशवा झाले.

कुशल कूटनीतिज्ञ

मालवा काबीज करण्यासाठी ते आपल्या काका चिमाजी आप्पासह मालवाकडे रवाना झाले. रस्त्यात मध्ये चिमाजी अप्पांची तब्येत बिघडली. त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात आले. दरम्यान 27 डिसेंबर 1740 साली पुण्यात चिमाजी अप्पा यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहिलीनंतर चिमाजी धौलपु्रला पोहोचले. तेथे मालवा आणि मराठा शासकांमध्ये काही गोष्टींवर करार झाला. ज्यात मालवाचे राज्यपाल पद 6 महिन्यात पेशव्यांसाठी सुरक्षित केले जावे अशी मागणी घालण्यात आली. त्यांच्या या कूटनीतीमुळे त्यांना यश मिळाले. त्यानंतर पेशवा बालाजीराव यांना डिप्टी नियुक्त करण्यात आले. ज्यामुळे बालाजी यांनी मालवावर आपला अधिकार मिळवला.

महत्त्वाकांक्षी शासक

एका गुटने कोर्टात पेशवा बालाजी विरोधात याचिका दाखल केली. हे प्रकरण इतके चिघळले की, पेशव्यांना आपले पद सोडावे लागले. मात्र त्यांनी सत्य समोर आणल्यानंतर पुन्हा त्या पदावर नियुक्त करण्यात आले. आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत बालाजी राव यांनी मराठा साम्राज्याला पेशावर पर्यंतचा विस्तार दिला.

पुण्याचा विकास

त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने पुण्याचा विकास केला. ज्यात मंदिर, पुल आणि जलाशयांचा समावेश होता. मात्र हा विकास ते फार काळ पाहू शकले नाही. 23 जून 1761 मध्ये त्यांचे निधन झाले.