Bakrid 2020 Simple Mehndi Designs: बकरी ईद (Bakrid) इस्लाम कॅलेंडरमधील 12 वा महिना जिल्हेज च्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार बकरी ईद 31 जुलै दिवशी सुरू होईल आणि 1 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत साजरी केली जाईल. पण, यंदाची बकरीईद थोडी वेगळी असेल. मुस्लिम धर्मगुरूंनी देशातील मुस्लिमांना कोरोना संक्रमणाचा धोका आहे, यामुळे ईदच्या दिवशी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून उत्सव साजरा करण्याचेआवाहन केले आहे. कुर्बानीचा हा सण मुस्लिम समाजातील पुरुष, स्त्रिया व मुले मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. या दिवशी बकऱ्यांचा बळी दिला जातो आणि त्याचे तीन भाग कुटुंब, मित्र आणि गरजूंमध्ये विभागले जातात. या दिवशी नवीन कपडे घातले जातात, विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. हा उत्सव साजरा करण्यासाठी महिला त्यांच्या हातावर मेहंदी काढतात. केवळ इस्लामच नाही तर सर्व धर्मातील स्त्रिया आपले विशेष सण साजरे करण्यासाठी हात-पायांवर मेंदी लावतात. (Bakrid 2020 Date: यंदा बकरी ईद चा सण कधी? जाणून घ्या ईद उल-अजहा ने ओळखल्या जाणार्या या सणाचं महत्त्व)
ईदच्या निमित्ताने बर्याच मुस्लिम महिलांना हात पायांवर मेहंदी लावायला आवडते. काहींना अरबी डिझाईन्स लावायला आवडतात, तर काही साध्या डिझाईन्स काढतात तर काही त्यांच्या संपूर्ण हातांवर मेहंदी लावतात. बकरीद 2020 च्या खास उत्सवानिमित्त आम्ही तुमच्यासाठी नवीन आणि आकर्षक मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या हातांवर वापरून शकतात.
बकरीदवर आपल्या संपूर्ण हातांनी हे सुंदर मेहंदी डिझाइन वापरुन पाहू शकता.
हाताच्या मागे काढण्यासाठी साधी डिझाइन
सोप्पी फिंगर मेहंदी डिझाइन
ब्रेसलेट मेहंदी डिझाइन
पायावरील मेहंदी डिझाइन
View this post on Instagram
Heena bridal mehendi design #heenamehendi #mehendi #support me#Love you all#support me
समोरच्या हातावरील मेहंदी डिझाइन
बकरीदसाठी खास हीना ट्यूटोरियल:
जर आपल्याला आपली मेहेंदी गडद करायची असेल तर आपण वाळलेल्या मेहंदीवर साखर आणि लिंबाच पाक लावू शकता. ही युक्ती मेहंदी अधिक गडद आणि अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी मदत करते.