
Bail Pola HD Images 2021: श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा राजाचा सण म्हणजे 'पोळा'. हा बैलांचा सण असून याला 'बैलपोळा' असेही म्हणतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैल या पशुधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते लोक मातीच्या बैलाची पूजा यादिवशी करतात.(Ganesh Chaturthi 2021 Invitation Card In Marathi: गौरी-गणपतीच्या दर्शनाला आप्तजनांना आमंत्रण देण्यासाठी WhatsApp Messages, निमंत्रण नमुने)
पोळ्याच्या दिवशी बैलांना कामापासून विश्रांती देण्यात येते. या दिवशी बैलांना काठीने मारत नाहीत. पोळ्याच्या आदल्या दिवशी त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेवून आंघोळ घालतात. या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. याला 'खांद शेकणे' असे म्हणतात. त्याच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. बळीराजा व त्याच्या घरातील सदस्य बैलाला पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी व ज्वारीच्या ठोंबराच्या जेवणाचे आमंत्रण देतात. सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.तर यंदाच्या बैल पोळ्यानिमित्त मराठमोठी शुभेच्छापत्र, Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून साजरा करा सण.





संपूर्ण वर्षभर बळीराजासोबत बैल शेतामध्ये राबत असतो. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी त्याला मानाचे निमंत्रण पारंपरिक पद्धतीने आजही दिले जाते. त्यामुळे आवतनाला विशेष महत्त्व आहे. पोळ्याकरिता बळीराजाने आपल्या सर्जा-राजाला हे आवतन देण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात जोपासलेली आहे.