भारतीय सण समारंभांमध्ये आपल्या संस्कृतीचं देखील दर्शन होतं. बैलपोळा (bail Pola) हा सण देखील त्याचंच उदाहरण आहे. कृषीप्रधान भारत देशामध्ये अन्नदात्यासोबत बैल देखील शेतात राबत असतो. बैलपोळ्याच्या निमित्ताने त्याला आराम देत त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. मग या बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकर्याला शुभेच्छा देण्यासोबतच बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Greetings शेअर करत आनंद व्यक्त करा.
बैलपोळ्याच्या निमित्ताने त्याचा साजश्रृंगार केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. तर शेतीच्या कामातून देखील सुट्टी दिली जाते. महाराष्ट्रात सारेच शेतकरी या निमित्ताने घरातील पशूधनाला जपतात. मग हा दिवस आनंदाने साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळली जाते त्याला खांदमळणी असेही म्हणतात. या निमित्ताने शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची रीत आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन बैलाच्या नाकात घालण्याची पद्धत आहे. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. नक्की वाचा: बैल पोळा साजरा करा खास; जाणून घ्या विदर्भातील परंपरा.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा
बैलपोळा महाराष्ट्रासोबतच आजूबाजूच्या प्रदेशातही साजरा केला जातो. प्रत्येक भागा प्रमाणे हा सण साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावास्या या दोन अमावस्या दिवशी बैलपोळा साजरा केला जातो. बैलपोळा, नंदी पोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत.